Ad imageAd image

केरळमध्‍ये पुन्‍हा ‘निपाह’ची धास्‍ती..! संसर्ग झालेल्‍या तरुणाचा मृत्‍यू

ratnakar
केरळमध्‍ये पुन्‍हा ‘निपाह’ची धास्‍ती..! संसर्ग झालेल्‍या तरुणाचा मृत्‍यू
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केरळमध्‍ये पुन्‍हा ‘निपाह’ची धास्‍ती..! संसर्ग झालेल्‍या तरुणाचा मृत्‍यू

केरळमधील मलप्पुरममध्ये २४ वर्षीय तरुणाचा उपचार सुरु असताना मृत्‍यू झाला होता. त्‍याला निपाह विषाणूची (Nipah virus) लागण झाली होती, अशी माहिती केरळच्‍या आरोग्‍य मंत्री वीणा जॉर्ज यांनी वृत्तसंस्‍था ANIला दिली.
आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या, “मलप्पुरम येथील एका तरुणावर खासगी रुग्‍णालयात उपचार सुरु होते. त्‍याला निपाह विषाणूचा संसर्ग झाल्‍याचा संशय होता. 9 सप्‍टेंबर राेजी तरूणाच्या मृत्यू झाला. त्‍याला निपाह विषाणू संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. मृत तरुण हा शिक्षणासाठी बंगळूर येथे राहत होता. त्याने भेट दिलेल्या ठिकाणांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत.”

रुग्णाला भेटलेले पाच जणांवर उपचार सुरु
संबंधित तरुणाने आपल्या मित्रांसह वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केला होता, आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेल्या लोकांपैकी पाच जणांमध्ये सौम्य ताप आणि इतर लक्षणे आढळून आली, त्यानंतर त्यांचे नमुनेही चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत, असेही आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले. दरम्‍यान, निपाह संसर्गावर उपचार घेत असलेल्या मलप्पुरममधील एका मुलाचाही २१ जुलै रोजी मृत्यू झाला. या वर्षात राज्यातील निपाह संसर्गाची ही पहिलीच घटना होती. 2018, 2021 आणि 2023 मध्ये कोझिकोड जिल्ह्यात आणि 2019 मध्ये एर्नाकुलम जिल्ह्यात निपाहचा उद्रेक दिसून आला हाेता.

Nipah virus म्हणजे काय?
निपाह विषाणू (NiV) हा एक आजार आहे जो प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरतो. त्याला झुनोटिक रोग म्हणतात. वटवाघुळ आणि डुकरांपासून ते मानवांमध्ये पसरू शकते. या विषाणूमुळे ताप, उलट्या, श्वसनाचे आजार आणि मेंदूला सूज येऊ शकते.

Nipah virus : लक्षणे काय आहेत?
विषाणूजन्य तापाची सामान्य लक्षणे निर्माण करण्याव्यतिरिक्त, हा संसर्ग मज्जासंस्थेवर देखील परिणाम करतो. मध्यवर्ती मज्जासंस्था देखील यामुळे प्रभावित होते, ज्यामुळे मेंदूला सूज किंवा एन्सेफलायटीस होतो. यामुळे २४ ते ४८ तासांत रुग्ण कोमात जाऊ शकतो.

निपाहचा संसर्ग आहे धोकादायक
निपाहचा संसर्ग झालेल्‍या व्‍यक्‍तीला ताप, डोकेदुखी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तसच मेंदूला सूज येण्याची शक्यता असते. जागतिक आरोग्‍य संघटनेच्‍या (WHO) माहितीनुसारनिपाह संसर्ग झालेल्‍या रुग्‍णाला ४० ते ७५ टक्‍के मृत्‍यूचा धोका असतो.

विषाणूला ‘निपाह’ नाव कसे दिले गेले?
जागतिक आरोग्‍यसंघटनेच्‍या (WHO) मते, निपाह विषाणू हा एक झुनोटिक विषाणू आहे, म्हणजे तो प्राणी आणि लोकांमध्ये पसरू शकतो. हा हवेतून पसरणारा संसर्ग नाही. मात्र दूषित अन्नाद्वारे किंवा थेट व्यक्ती-व्यक्तीद्वारे संक्रमित होऊ शकतो. निपाह विषाणू डुकरांना आणि माणसांमध्ये आजार निर्माण करण्यासाठी देखील ओळखला जातो. या विषाणूचे नाव निपाह हे मलेशियातील गावातून घेतले गेले आहे. येथे या विषाणूमुळे पहिला रुग्‍ण बळी गेला होता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article