किनये ग्रामपंचायत विकास आघाडी कमिटीच्या सर्व सदस्यांच्या संमतीने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड केली गेली. किनये ग्रामपंचायत ही 22 सदस्यांची ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीत भारतीय जनता पक्ष, काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सदस्यांनी ग्रामपंचायत विकास आघाडी कमिटीतर्फे एकत्र येऊन अध्यक्षपदी मागास अ वर्गासाठी अर्चना चिगरे आणि उपाध्यक्षपदी धर्माना पाटील यांची सामान्य वर्गासाठी निवड केली गेली.
यामध्ये राजकीय कुजबुज झाली तरी सर्व सदस्यांनी एकत्र येऊन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड केली. नूडल अधिकारी E.E. सुभाष नाईक हे निवडणूक अधिकारी म्हणून उपस्थित होते. सदस्यांच्या मागणीनुसार मतदानाची व्यवस्था केली गेली. त्यापैकी अध्यक्षांना 13 मते आणि उपाध्यक्षांना 14 मते मिळवून विजयी घोषित करण्यात आले.
.
अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या विरोधात अध्यक्ष पदाला 9 विरोध मते पडली तर उपाध्यक्ष पदाला 8 विरोध मते पडली. या सर्व घडामोडीत काँग्रेस पक्षाचा मोठा विजय झाला म्हणून काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून विजय उत्सव साजरा केला ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले तसेच मतदार आणि कार्यकर्त्यांना धन्यवादही दिले त्यामुळे काँग्रेस पक्ष आपले शक्ती प्रदर्शन करत आहे असे स्थानिक राजकीय विश्लेषक यांच्याकडून मत व्यक्त केले जात आहे.