गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात ग्रामीण भागातून शहरी भागाकडे येणाऱ्या गणेश भक्तांना पुरेपूर बस व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी करत युवा नेते मृणाल हेबाळकर यांच्या नेतृत्वाखाली बागेवाडी व उचगाव युथ काँग्रेस वतीने के एस आर टी सी विभागीय नियंत्रण अधिकारी यांची भेट घेऊन
निवेदन सादर करण्यात आले , गेल्या दोन वर्षापासून गणेश उत्सव या कोणताही उत्सव कोविडमुळे साजरा करता आला नाही ,पण यावर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यास सारेच सज्ज झाले आहेत ,अशा परिस्थितीत मुबलक प्रमाणे बस व्यवस्था असणे गरजेचे आहे, यासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या भक्तांना बसव्यवस्था करण्यात यावी अशी मागणी उचगाव व बागेवाडी युथ काँग्रेस युवकांच्या वतीने बसेसची मागणी करण्यात आली यावेळी युवा नेते मृणाल हेंबाळकर यांनी के एस आर टी सी विभागीय नियंत्रण
अधिकारी टी वाय नाईक यांना सविस्तर माहिती दिली , यानंतर अधिकारी नाईक यांनी सद्य परिस्थितीत बदल माहिती देत गणेश उत्सव दरम्यान बस व्यवस्था करण्यास मी प्रामाणिक प्रयत्न करेन असे आश्वासन देण्यात आले. यावेळी ग्रामीण भागातील युवा कार्यकर्ते मंजुनाथ तुक्कार, वकील हर्षवर्धन पाटील, अजित कदम ,शरद पाटील, महांतेश पारिषवाडी, विठ्ठल लोलसे, सचिन किल्लेकर, हल्लाप्पा पुजेरी, मुर्शिधा बाळेकुंद्री, प्रेम कोलकार, संगप्पा कुडची, पवन, प्रवीण सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते