spot_img
15.1 C
Belagavi
Friday, December 9, 2022
spot_img
spot_img

खानापूर क्षेत्रात काँग्रेसच्या शक्ती प्रदर्शन खानापूर आमदार डॉ.

अंजली निंबाळकर आणि के पी सी सी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीमध्ये भाजपा, जेडीएस, महाराष्ट्र एकीकरण समिती चे कार्यकर्ता काँग्रेसमध्ये अधिक संख्येने सामील झाले. ह्या साठ वर्षांमध्ये काँग्रेस पक्षाने देशाला काय दिले ह्या प्रश्नाला उत्तर देत अंजली निंबाळकर म्हणाले की काँग्रेस पक्षाने या देशाला विकास आणि समृद्धी दिली.

मी आज पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना सांगू इच्छिते की , तुम्ही जन्मलेले हॉस्पिटल आणि शिकलेल्या शाळा आहेत त्या काँग्रेसने दिलेल्या आहेत. काँग्रेस पक्ष ह्या गेल्या साठ वर्षांमध्ये समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनामध्ये मनरेगा योजना असू दे, अन्नभाग्य शिराभाग्य असू दे. आज इथं जास्त जास्त संख्या महिला उपस्थित आहे महिलांना पण राजकीय समानता मिळावी म्हणून काँग्रेस पक्षाने महिला आरक्षण मध्ये स्थळीय आहे, या संस्थांमध्ये 50 टक्के आरक्षण दिले आहे.

जनकल्याण योजना काँग्रेस पक्षाने राबवली आहे. आज तुम्ही काँग्रेसने 60 वर्षांमध्ये काय केले म्हणून प्रश्न उद्भभव करता काँग्रेस पक्षाने समृद्धीचा वाटे वरती या देशाला चालवले आहे. देशाचा कुठलाही प्रसंग आहे काँग्रेस ठाम पणाने आपला भूमिका आणि आपले समर्पण दिलेले आहे. आज खानापूर तालुक्यामध्ये एक बस स्टॅन्ड आणि रस्ते निर्माण झाले नव्हते आज तेच काँग्रेस पक्षाने करून विकास म्हणजे काय असतो ह्या लोकांना दाखवून दिले आहे.

मला कुठल्याही जाती धर्मचा भेद नाही, आज माझ्या सोबत सर्व जाती-धर्माचे लोक माझ्याबरोबर आहेत हे तुम्हाला दिसत आहे. खानापूर गेल्या 40-50 वर्षापासून विकासाची वाट बघत होता आज तुमच्या सर्वांचे आशीर्वादामुळे आज खानापूर विकासाच्या वाटेवरती चालत आहे असे डॉ. अंजली निंबाळकर यांनी भाजपा आणि एम एस नेत्यांना सुनावले. ह्या दोषी इतक्या संख्यांमध्ये काँग्रेस पक्षाकडे दुसरे पक्षाकडून काँग्रेसमध्ये येत आहेत ह्याचा पुरावाच आहे की डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या नेतृत्वात खानापूर मतक्षेत्राचा विकास आणि समृद्धीचे वाटेवरती चालत आहे पहिला बेळगाव मध्ये भाषा राजकारण चालत होता हे आता बदल झालेला आहे आता लोकांना समजत आहे की आम्हाला विकासाच्या वाटेवरील आमची समृद्धी होणार आहे असे केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी ह्याने आपले मत मांडले.

ह्या काँग्रेसचे नेते अस्मानी गवस, लाल पाटील, विजय सानिकोप, महांतेश राऊत, अशोक अंगडी, मंगेश गुरव, संबर्गी ग्रामपंचायत अध्यक्ष सदस्य आणि महिला कार्यकर्ते अधिक संख्येने उपस्थित होते. -नंदिनी जी.बेळगाव खानापूर.

Related News

गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीचे निकाल आज जाहीर

नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. त्याचप्रमाणे 5 राज्यांतील रिक्त जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकालही आज जाहीर...

कर्नाटकात सामील होण्याच्या मागणीसाठी गावच्या निवडणुकीवर बहिष्कार टाका

बीदर : सीमावादाच्या पार्श्‍वभूमीवर लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्‍यातील बोंबळी येथील नागरिकांनी महाराष्ट्र गाव कर्नाटकात जोडले जावे, अशी मागणी केली आहे. बोंबळी गावातील रहिवाशांनी गावात बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest News

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img