केएलएस श्री वसंतराव पोतदार पॉलिटेक्निक महाविद्यालयाचा विद्यार्थी विघ्नेश महादेव पवार याने इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन शाखेची अंतिम परीक्षा प्रथम श्रेणीसह गुणवत्तेत उत्तीर्ण होत अभिनंदन यश मिळवले आहे.
राज्याच्या तांत्रिक शिक्षण विभागाच्या तांत्रिक परीक्षा मंडळांने घेतलेल्या यंदाच्या इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन शाखेच्या सहाव्या सेमिस्टर अंतिम परीक्षेमध्ये विघ्नेश पवार हा 98.5 टक्के गुण संपादन करून प्रथम श्रेणीसह गुणवत्तेत उत्तीर्ण झाला आहे.
अत्यंत मेहनत आणि कष्टातून विघ्नेश याने सदर यश संपादन केले आहे. विघ्नेश हा बेळगाव सिटी न्युजचे पत्रकार महादेव पवार यांचे चिरंजीव आहे. त्याला आई- वडिलांचे प्रोत्साहन तसेच विभाग प्रमुख प्रा. अमृता देवणगावी यांच्यासह प्रा. नीलम सोमन्नावर आणि प्रा. अभिमान देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. उपरोक्त यशाबद्दल विघ्नेश पवार याचे महाविद्यालया सहित सर्वत्र अभिनंदन होत आहे.