Ad imageAd image

लोकशाही दिनानिमित्त 15 रोजी 145 कि.मी.ची मानवी साखळी -जिल्हाधिकारी

ratnakar
लोकशाही दिनानिमित्त 15 रोजी 145 कि.मी.ची मानवी साखळी -जिल्हाधिकारी
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव  : आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त भारताची लोकशाही आणि देशाचे संविधान अर्थात राज्यघटनेच्या महत्त्वासंदर्भात जनजागृती करण्यासाठी येत्या रविवार दि. 15 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात 145 कि.मी. लांबीची विशाल मानवी साखळी निर्माण केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात काल गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. आपल्या देशाचे संविधान अर्थात राज्यघटनेचे मूल्य आणि महत्त्व या संदर्भात जनतेमध्ये जागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

गेल्या वर्षी 15 सप्टेंबर रोजी एकाच वेळी संविधान अभ्यासक्रमाचे सामूहिक वाचन करून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला होता. या वेळी बोलताना बिदर जिल्ह्यातील बसवा कल्याण यांनी 30 जिल्ह्यात मानवी साखळी निर्माण करून भारतीय राज्यघटनेच्या महत्त्वाबाबत जनजागृती केली जाणार असल्याचे सांगितले.

आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त बागलकोट जिल्ह्यात निर्माण केली जाणारी मानवी साखळी रामदुर्ग तालुक्यातील सालहळ्ळी गावातून सुरू होऊन कित्तूर तालुक्यातील तेगुरा गावात समाप्त होईल. या पद्धतीने एकंदर जिल्ह्यात 145 कि.मी. अंतराची मानवी साखळी तयार करण्याचे नियोजन आहे.

या उपक्रमात अंदाजे 1 लाख 25 हजार लोक सहभागी होत आहेत. रामदुर्ग तालुक्यातील सालहळ्ळी, के. चंदरगी, सौंदत्ती तालुक्यातील सोपडले, यरगट्टी, इंचरला क्रॉस, बैलहोंगल तालुक्यातील नेसरगी क्रॉस, सुतगट्टी क्रॉस, बेळगाव तालुक्यातील करडीगुद्दी, सांबरा, बेळगाव शहर, सुवर्ण विधान सौध, हिरेबागेवाडी, एम के हुबळी या गावांचा समावेश आहे.हुबळी, इटागी क्रॉस, चन्नम्मांच्या कित्तूर मार्गे तेगुरा गावापर्यंत ही मानव साखळी असेल अशी माहिती देऊन लोकशाही दिनाच्या निमित्ताने त्या दिवशी बेळगावच्या सुवर्ण विधान सौध येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या रविवारी 15 रोजी सकाळी 9.30 ते 10.30 या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात शाळा -महाविद्यालयीन विद्यार्थी, ग्रामपंचायतीचे अध्यक्ष, सदस्य, संघटना व विविध संघटना सहभागी होणार आहेत. सदर कार्यक्रमात सर्वांनीच मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन यशस्वी करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले.

जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रत्येक गावात स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्यासाठी घ्यावयाच्या क्रमाबाबत मार्गदर्शन केले. मानवी साखळीचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक पातळीवर संघ तयार करण्यात आले असून प्रत्येकी 200 मी. अंतरावर एक सेक्टर ऑफिसर प्रति 1 की.मी.वर तालुका स्तरावरीय आणि प्रत्येक 5 कि.मी.वर जिल्हास्तरीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

मानवी साखळी उभारणीत लोकांना मोठ्या संख्येने स्वेच्छेने सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी जनजागृतीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. उपक्रम यशस्वी करण्यासाठी के.एस.आर.टी.सी आणि शालेय वाहने वापरली जात आहेत. कालच्या पत्रकार परिषदेस समाजकल्याण विभागाचे सहसंचालक रमणगौडा कन्नोळी व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article