C-295 Aircraft Specialty : गेल्या काही वर्षात भारताने अनेक क्षेत्रात स्वदेशी संकल्पना सत्यात उतरवण्यात यश मिळवलं आहे. या यादीत आता आणखी एक नाव जोडलं जाणार आहे आणि ते म्हणजे भारतीय विमान उद्योगाने सोमवारी आणखी एक टप्पा पार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीआणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी गुजरातमध्ये टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (TASL) चे उद्घाटन केले. या कारखान्यात C-295 विमानांची निर्मिती केली जाईल. भारतीय भूमीवर तयार होणारे हे पहिले स्वदेशी विमान असेल. टाटा आणि फ्रेंच कंपनी एअरबस संयुक्तपणे याची निर्मिती करणार आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हा प्रोजक्ट देशाच्या विमान उद्योगासाठी मैलाचा दगड असल्याचे म्हटले. तसेच या कार्याचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
वास्तविक, संरक्षण मंत्रालयाने 2021 मध्ये एअरबस डिफेन्स आणि स्पेस एसए, स्पेनसोबत 21,935 कोटी रुपयांचा करार केला होता. या अंतर्गत भारताला 56 सी-295 वाहतूक विमानांचा पुरवठा केला जाणार आहे. या विमानाद्वारे भारतीय हवाई दलाचे Avro-748 विमान रिप्लेस केले जाणार आहे. करारानुसार, स्पेनमधून 16 विमाने पूर्णपणे असेंबल करून पाठवायची होती, तर 40 विमाने येथे असेंबल केली जाणार आहे. सप्टेंबर 2029पर्यंत वडोदरा प्लांटमधून पहिले विमान तयार होईल, असा विश्वास आहे.
विमानातील बहुतांश भाग स्वदेशी
एअर इंजिन वगळता या विमानाचे बहुतांश भाग भारतात बनवले जाणार आहेत. विमानात सुमारे 14 हजार पार्ट्स बसवलेले आहेत, त्यापैकी 13,000 पार्ट भारतात बनवले जातात. साहजिकच हे विमान मेड इन इंडियन असणार. टाटा आणि एअरबसच्या सहकार्यातून वडोदरा येथील प्लांटमध्ये याची निर्मिती केली जाणार आहे.
C-२९५ विमानाची क्षमता किती आहे?प्रतिकूल परिस्थितीत देखील उड्डाण करण्याची क्षमता या विमानाची आहे. 5 ते 10 टन क्षमतेच्या या वाहतूक विमानात लष्करी तुकड्या वाहून नेण्याची क्षमता असून ते मालवाहतूकही करू शकते. या संयुक्त उपक्रमामुळे भारतीय एरोस्पेसमध्ये नोकरीच्या संधीही निर्माण होणार आहेत. एअरबस देखील आपले उत्पादन भारतात हलवत आहे. टाटा-एअरबस सुविधेमुळे 600 प्रत्यक्ष नोकऱ्या आणि 3,000 अप्रत्यक्ष नोकऱ्या नव्याने निर्माण होतील.