नवी दिल्ली : देशभर आज रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात असताना सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या किमतींनी गिअर बदलल्याचे दिसत आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी दोन्ही धातूंनी उसळी घेतली आहे. जागतिक बाजारात सोने-चांदीच्या दरांनी आगेकूच केली असताना त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येत आहे. भारतीय बाजारात सोन्यासह चांदीने उसळी घेतली असून ऑगस्ट महिन्यात दरवाढीने ब्रेक घेतल्यानंतर शेवटच्या दिवसात सोने-चांदीने दरवाढ नोंदवली आहे.