Ad imageAd image

मुंबईत दहीहंडी फोडताना दुपारपर्यंत १५ गोविंदा जखमी

ratnakar
मुंबईत दहीहंडी फोडताना दुपारपर्यंत १५ गोविंदा जखमी
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू असून, त्यातच आज दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये लागलेली चुरस या दरम्‍यान थरावर थर रचताना दुपारपर्यंत मुंबईत सुमारे 15 गोविंदा जखमी झाल्‍याची माहिती समोर आली आहे. या गोविंदांवर बाह्य रुग्ण विभागात उपचार करण्यात आले. या सर्व गोविंदाची प्रकृती आता  ठिक आहे.

मुंबईत सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली आहे, मात्र गोविंदाचा उत्साह मात्र कमी झालेला नाही. सकाळपासूनच मुंबईतील गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडण्यास सुरुवात केली आहे. दहीहंडी फोडताना जखमी गोविंदा दुपारपासून रूग्णालयात येण्यास सुरुवात झाली. त्‍यामुळे पालिकेची वैद्यकीय यंत्रणा सकाळपासूनच कामाला लागली आहे.

जखमी गोविंदांपैकी केईएम रुग्णालयात 1, पोद्दार रूग्णालयात 4, सेंट जॉर्जेस 1, नायर रुग्णालयात 4, सायन 2, राजावाडीत 4, एमटी अग्रवाल 1, कुर्ला भाभा रूग्णालयात 1 गोविंदावर बाह्यरुग्ण विभागात उपचार करण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article