spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
26.6 C
Belagavi
Friday, September 22, 2023
spot_img
spot_img

ऑलिम्पिक कुस्तीपटूंना खोलीत बोलवून तो….’, राहुल गांधीच्या ‘Flying Kiss’ वरुन आर-पारची लढाई

नवी दिल्ली : लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी सभागृहाच्या बाहेर जाताना फ्लाईंग किसने इशारा केला, असा स्मृती इरानी यांचा आरोप आहे. स्मृती इरानी यांच्या आरोपानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या भाजप-काँग्रेसमध्ये आरो-प्रत्यारोप सुरु आहेत. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

स्वाती मालिवाल यांनी टि्वट करत मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. “हवेत फेकलेल्या एका कथित फ्लाईंग किसने इतकी आग लागली आहे. पण दोन रांगा मागेच एक व्यक्ती बृजभूषण बसलाय. त्याने ऑलिम्पिक कुस्तीपटूंना खोलीत बोलवून त्यांच्या छातीवर हात ठेवला. कमरेत हात घातला. त्यांच लैंगिक शोषण केलं होतं. त्याने जे केलं त्यावर राग का येत नाही?” असं स्वाती मालिवाल यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

बृजभूषण शरण सिंह भारतीय जनता पार्टीचा खासदार आहे. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान बृजभूषण शरण सिंह सभागृहात उपस्थित होता. महिला कुस्तीपटूंच लैंगिक शोषण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. म्हणूनच स्वाती मालिवाल यांनी बृजभूषणच्या निमित्ताने मोदी सरकारवर निशाणा साधलाय.

बुधवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मणिपूर मुद्यावरुन संसदेत भाषण केलं. मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या झाली, असं राहुल गांधी म्हणाले. त्यांना लगेचच स्मृती इराणी यांनी उत्तर दिलं. या दरम्यान स्मृती इराणी यांनी आरोप केलाय की, राहुल गांधी सभागृहाबाहेर जात असताना, ट्रेजरी बेंचकडे फ्लाईग किसचा इशारा केला. राहुल गांधी यांच हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं नाही. पण दोन डझन महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटून त्यांच्याकडे राहुल गांधी यांची तक्रार केली आहे. वायनाडमधून खासदार असलेल्या राहुल गांधींवर कारवाईची मागणी केली आहे.

Related News

भाजप जेडीएस आघाडीची आज बैठक झाली

दिल्ली : अमित शहा आणि एचडी कुमारस्वामी यांच्यात काल ठरलेली बैठक आज ठरली आहे. लोकसभेचे विशेष अधिवेशन काल उशिरा संपल्याने आज युतीची चर्चा होणार...

शिमोगा : जुन्या भांडणाची पार्श्‍वभूमी दोन गटात झालेल्या भांडणात शिमोगा येथील द्रौपदम्मा सर्कल येथे रात्री उशिरा झालेल्या भांडणात 5 जणांना भोसकले. पवन आणि किरण...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest News

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img