यनकनमर्डी येथील काँग्रेसचे आमदार सतीश जारक्कीहोळी यांनी हिंदू शब्द हा पर्शियन असून त्याचा अर्थ घाणेरडा आहे असे वक्तव्य केले आहे. तरी भाजपकडून याचा कडाडून निषेध केला जात आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी ही चुकीचा इतिहास सांगितल्यामुळे बेळगावात भाजपतर्फे मोर्चा काढून त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
काही दिवसांपूर्वी निपाणी येथे एका कार्यक्रमात बोलताना आमदार सतीश जारक्कीहोळी यांनी हिंदू शब्द हा पर्शियन असून त्याचा अर्थ घाणेरडा असा होतो, असे वक्तव्य केले होते. त्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीही त्यांच्याकडून चुकीचा इतिहास सांगण्यात आला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे कर्नाटकातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून बेळगाव सह अनेक ठिकाणी यांचा निषेध करण्यात येत आहे. तरी त्यांच्या या वक्तव्यावर त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपाकडून केली जात आहे.
बेळगावातही भाजपा कार्यर्कत्यांनी मानवी साखळी तयार करून वाहतूक रोखून धरली. तसेच जारक्कीहोळी यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्नही केला गेला.
दरम्यान भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. तथापि जारक्कीहोळी हे आपल्या वक्तव्यवर ठाम असून हवे असल्यास राज्य सरकारने समिती नेमून याची चौकशी करावी. चौकशी समितीने दोषी सिद्ध झाल्यास माफीच काय! मी राजकारणाचा संन्यास घेईन असे पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केले आहे.