महाविकास आघाडीवर महायुतीची कुरघोडी, उमेदवार जाहीर करण्यात भाजप अव्वल, पाहा संपूर्ण यादी
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची यादी कोणत्याही क्षणी येणार असल्याचे शनिवारी माध्यमांशी बोलताना म्हटले होते. तसेच महायुतीमधील प्रत्येक पक्ष आपली यादी जाहीर करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आता भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे.
Bjp First List Maharashtra: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष सक्रीय झाले असून महायुती आणि महाविकास आघाडीत बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. जागा वाटपावर चर्चा सुरु झाल्या आहेत. यामध्ये आता महायुतीने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीत शिवसेना उबाठा आणि काँग्रेसमध्ये वाद झाल्याच्या बातम्या असताना महायुतीने आघाडी घेतली आहे. महायुतीमधील भाजपने उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात एकूण ९९ उमेदवार आहेत. ज्या जागांवर मतभेद नाही, त्या जागा जाहीर झाल्या आहेत.
भाजपने घेतली आघाडी
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची यादी कोणत्याही क्षणी येणार असल्याचे शनिवारी माध्यमांशी बोलताना म्हटले होते. तसेच महायुतीमधील प्रत्येक पक्ष आपली यादी जाहीर करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आता भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीची आठ दहा तास बैठक झाली असताना त्यातून जागा वाटप पूर्ण झाले नाही. परंतु दुसरीकडे भाजपने आघाडी घेत उमेदवारी यादी जाहीर केली आहे.
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता यावेळची निवडणूक महायुतीविरोधात महाविकास आघाडी अशीच रंगणार आहे. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीमधील कोणत्या घटक पक्षांच्या वाट्याला किती जागा येणार याबाबत आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दोन्ही युती आणि आघाडीने अद्याप जागा वाटप जाहीर केले नाही. परंतु भाजपने उमेदवारी यादी जाहीर केली आहे. भाजपनंतर आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची यादी येण्याची शक्यता आहे.
राज्यात विधानसभेची निवडणूक २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तसेच निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. २६ नोव्हेंबर पूर्वी राज्यात नवीन सरकार अस्तित्वात येणे गरजेचे आहे. अन्यथा राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे.