spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
26.6 C
Belagavi
Friday, September 22, 2023
spot_img
spot_img

भाजपकडून माझ्या भारतमाता आईची हत्या,मणिपूरवरुन संसदेत राहुल गांधी आक्रमक

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खासदारकी परत मिळाल्यानंतर संसदेत दमदार एन्ट्री घेतली आहे. मणिपूरच्या धगधगत्या विषयावरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल चढवला. नरेंद्र मोदी यांच्या मते मणिपूर हा भारताचा भाग नाही, ते मणिपूरला गेले नाहीत, पण मी तिथे गेलो. मणिपूर तोडून तुम्ही त्याचे दोन भाग केलेत, भारतमाता माझी आई आहे, मोदी सरकारने मणिपूरमध्ये माझ्या आईची हत्या केली, अशा शब्दात राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

राहुल गांधी काय म्हणाले?

मी आज डोक्याने नाही तर मनापासून बोलणार आहे. मी आज अदानींविषयी बोलणार नाही, त्यांच्याविषयी बोललं की काही जणांना त्रास होतो. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी रिलॅक्स राहावं, असं म्हणत राहुल गांधी यांनी भाषणाला सुरुवात केली. मी १०३ दिवस भारत जोडो यात्रेदरम्यान देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत भारत जोडो यात्रा केली. भारत जोडो यात्रेदरम्यान दररोज भारतीयांचा ‘आवाज’ ऐकला, समाजातील सर्व घटकांचा आवाज ऐकला. भाजपने मला दहा वर्ष शिव्या घातल्या, म्हणूनच देशाला समजून घेण्यासाठी मी भारत जोडो यात्रा केली. भारत जोडो यात्रेआधी माझ्यात अहंकार होता, मात्र नंतर तो गळून पडला.

मणिपूरविषयी तुम्ही खोटं बोलता, मी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मते मणिपूर हा भारताचा भाग नाही, ते तिथे गेले नाहीत, पण मी मणिपूरला गेलो, मला तिथे एक महिला भेटली. तिने सांगितलं की माझ्या एकुलत्या एका मुलाला मी डोळ्यादेखत गोळी लागताना पाहिलं. मी अख्खी रात्र त्याच्या मृतदेहासमोर बसून काढली. मला भीती वाटली, मी घर सोडलं, अशी कहाणी एका मणिपुरी महिलेनं सांगितल्याचं राहुल गांधी सदनात म्हणाले. मणिपूरचे तुम्ही दोन तुकडे केले आहेत. भारतमाता माझी आई आहे, मोदी सरकारने मणिपूरमध्ये माझ्या आईची हत्या केली. या लोकांनी फक्त मणिपूरच नाही, तर संपूर्ण देशाचा खून केला आहे, तुम्ही देशप्रेमी नाही तर देशद्रोही आहात, तुम्ही भारत मातेचे रक्षक नाही, तर हत्यारे आहात, असा हल्लाबोल राहुल गांधींनी चढवला. राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी संसदेत एकच गोंधळ घातला.

Related News

भाजप जेडीएस आघाडीची आज बैठक झाली

दिल्ली : अमित शहा आणि एचडी कुमारस्वामी यांच्यात काल ठरलेली बैठक आज ठरली आहे. लोकसभेचे विशेष अधिवेशन काल उशिरा संपल्याने आज युतीची चर्चा होणार...

शिमोगा : जुन्या भांडणाची पार्श्‍वभूमी दोन गटात झालेल्या भांडणात शिमोगा येथील द्रौपदम्मा सर्कल येथे रात्री उशिरा झालेल्या भांडणात 5 जणांना भोसकले. पवन आणि किरण...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest News

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img