Ad imageAd image

भारताचा नकाशा चुकीचा दाखवण्याच्या मुद्द्यावरून भाजपने केले गंभीर आरोप, गदारोळानंतर पोस्टर हटवले; नेमक घडलं काय…

ratnakar
भारताचा नकाशा चुकीचा दाखवण्याच्या मुद्द्यावरून भाजपने केले गंभीर आरोप, गदारोळानंतर पोस्टर हटवले; नेमक घडलं काय…
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : 1924 च्या काँग्रेस अधिवेशन शताब्दी महोत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात सर्वत्र पोस्टर्स लावण्यात आले आहेत. मात्र काँग्रेस कार्यकारिणी बैठकीपूर्वी या पोस्टरवरून मोठा गदारोळ झाला. पक्षाने लावलेल्या पोस्टरमध्ये भारताचा नकाशा चुकीचा दाखवण्यात आल्याचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेला आला.

हि बाब सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वायरल झाली. अखेर हे पोस्टर्स हटविण्यात आले असून या मुद्द्यावरून भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपने याला काँग्रेसचे व्होट बँकेचे राजकारण म्हटले आहे.

बेळगाव शहरात लावण्यात आलेल्या पोस्टरवर पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि चिनचा भाग वगळण्यात आला होता. यावरून भारत तोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला. भारताचा चुकीचा नकाशा असल्याचे वृत्त सर्वत्र पसरले आणि यासंदर्भात बेळगावसह देशभरात मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली.

सोशल मीडियावरदेखील याचा निषेध होऊ लागला. यावर काँग्रेसने स्पष्टीकरण देताना सदर पोस्टर हे पक्षाचे नसून वैयक्तिक स्थानिक नेत्याने लावल्याचे सांगितले. काँग्रेसने लावलेले अधिकृत पोस्टर्स हे योग्य असून त्यावर भारताचा योग्य पद्धतीने नकाशा असल्याचेही काँग्रेसने सांगितले.

वैयक्तिक पातळीवर, अनधिकृत पद्धतीने लावण्यात आलेल्या पोस्टरवरील चूक लक्षात येताच तातडीने ते पोस्टर्स हटविण्यात आल्याचेही काँग्रेसने स्पष्ट केले. शिवाय या मुद्द्यावरून जनतेत चुकीची माहिती पसरवून विरोधक जनतेला भडकवण्याचे काम करत असल्याची टीकाही काँग्रेसने केली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article