भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नागेश मनोळकर यांनी ग्रामीण मतक्षेत्रातून हजारोच्या समर्थकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला ग्रामीण मत क्षेत्रामध्ये भाजपाचे प्राबल्य वाढवण्यासाठी म्हणून शक्ती प्रदर्शन करत नागेश मनोरकर यांनी आपला अर्ज दाखल केला आहे प्रतिस्पर्धी महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवार आर एम चौगुले आणि काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मीताई हेबाळकर व भाजपा उमेदवार नागेश मनोरकर यांच्यात त्रिशंकू लढत होणार आहे सकाळी 11 पासूनच बेळगाव येथील सरदार मैदान वरती ग्रामीणमध्ये क्षेत्रातून भाजपा कार्यकर्ते व मतदार जमा होऊ लागले यानंतर छत्रपती संभाजी महाराज चौकातून या शक्तिप्रदर्शन रॅलीला सुरुवात झाली यापूर्वी उमेदवार नागेश मनोरकर व भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील भाजपा नेता किरण जाधव बुडाधक्ष संजय बेळगावकर या सह अनेक नेत्यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला हार अर्पण करून शक्ती प्रदर्शन रॅलीला सुरवात झाली नाम पत्र दाखल करण्यासाठी निघालेली ही रॅली कॉलेज रोड कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल ते तहसीलदार कार्यालयापर्यंत काढण्यात आली हजारोंचा माब असलेली ही रॅली सर्वांना पाहायला मिळाली यावेळी नागेश मनोरकर यांनी ग्रामीण भागातील सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगत मला बहुमताने जनता निवडून देतील अशी अशा व्यक्त केले माजी आमदार संजय पाटील देखील यावेळी सर्वांना भाजपच्या उमेदवाराला बहुमताने निवडून अनुया असे म्हणत आपले विचार प्रकट केले आजच्या या शक्तिप्रदर्शन रॅलीमध्ये व युवा कार्यकर्त्यांचा समावेश होता.