Bhool Bhulaiyaa 3 : कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया ३’ ची रिलीज डेट आली समोर
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री विद्या बालन यांचा ‘भूल भुलैया’ हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला. हा चित्रपट हिट झाल्यानंतर निर्मात्यांनी २०२२ मध्ये ‘भूल भुलैया २’ प्रदर्शित केला होता. मात्र, या चित्रपटात अक्षय कुमारची जागा बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने घेतली. यानंतर ‘भूल भुलैया’च्या तिसऱ्या भागाची चाहत्यांना आतुरता लागली. निर्मात्यांनी पुन्हा ‘भूल भुलैया ३’ ची घोषणा करत जोरदार कंबर कसली. आता या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. तसेच तीन तगड्या अभिनेत्री चित्रपटात दिसणार असल्यामुळे चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर
मिळालेल्या माहितीनुसार, निर्माता भूषण कुमार यांनी या चित्रपटाची घोषणा करत रिलीज डेट समोर आणली आहे. ‘भूल भुलैया 3’ हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजे, १ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. यावरून ‘भूल भुलैया 3’ हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. यामुळे चाहत्यांचा आनंद वाढला आहे.
काही दिवसांपूर्वी कार्तिक आर्यनने चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या रिलीज डेटबाबत संकेत दिले होते. या चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यात लिहिले होते की, ‘या दिवाळीला भेटूया.’
‘भूल भुलैया’ च्या पहिल्या भागात अभिनेता अक्षय कुमार, विद्या बालन, शायनी आहुजा, राजपाल यादव आणि परेश रावल या कलाकारांनी भूमिका साकारली होती. दुसऱ्या भागात अक्षयची जागा कार्तिक आर्यन घेतली. आणि अनीस बज्मी यांनी दिग्दर्शन केले होते. कार्तिकसोबत या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी दिसली. आता तिसऱ्या भागात कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी, माधुरी दीक्षित आणि विद्या बालन हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.