Ad imageAd image

थंडीची चाहूल; बेळगावचे तापमान घसरून 15.4 अंशावर

ratnakar
थंडीची चाहूल; बेळगावचे तापमान घसरून 15.4 अंशावर
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : हवामान बदलाचा बेळगाव शहरासह ग्रामीण भागाला थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली असून पारा घसरू लागला आहे.
सध्या बेळगाव शहराचे कमाल तापमान 29.6 अंश सेल्सिअस इतके स्थिर असले तरी कालच्या 16.4 अंशच्या तुलनेत आज शुक्रवारी सकाळी तापमान आणखी घसरून 15.4 अंश सेल्सिअस इतके झाले होते.

यंदा गेल्या ऑक्टोबरपर्यंत लांबलेला पावसाळ्याचा मौसम कांही दिवसापूर्वी संपला असून परतीचा पाऊस पूर्णपणे थांबल्यानंतर आता थंडीची चाहूल लागू लागली आहे. शहर परिसरात पहाटेपासून सकाळपर्यंत त्याचप्रमाणे सायंकाळनंतर थंडी पडू लागली आहे.
परिणामी नागरिकांनी स्वेटर, गरम जॅकेट, कानटोप्या, शाल, मफलर वगैरे ठेवणेतील उबदार कपडे बाहेर काढण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून शहर आणि ग्रामीण भागातील किमान तापमान घसरू लागले असून कमाल तापमान सध्या 29.6 अंश सेल्सिअस इतके झाले आहे.

परिणामी ऑक्टोबरमध्ये जाणवणारी हिट आता नाहीशी झाली असून दिवसभर ऊन असूनही त्याची झळ जाणवणे कमी झाले आहे. गेल्या एक-दोन दिवसांपासून पहाटे थंडीची तीव्रता वाढण्याबरोबरच धुक्याची झालरही पसरत आहे. त्यामुळे सकाळी फिरावयास जाणाऱ्या मॉर्निंग वॉकर्सच्या अंगावर कान टोप्या आणि उबदार कपडे दिसू लागले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article