Ad imageAd image

बेळगाव : ऑस्ट्रेलियाच्या विद्यार्थ्यांची राजहंसगडाला भेट

ratnakar
बेळगाव : ऑस्ट्रेलियाच्या विद्यार्थ्यांची राजहंसगडाला भेट
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राजहंसगडाला ऑस्ट्रेलिया येथील साऊथ क्रॉस युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि. १९) भेट दिली. गडाची माहिती जाणून घेतली. गड परिसरातील स्वच्छता पाहून ते प्रभावित झाले. यावेळी शिवरायांच्या जयजयकाराच्या जोरदार घोषणा दिल्या.

राजहंसगडाचे सुशोभिकरण करण्यात आल्याने याठिकाणी अनेक पर्यटक रोज हजेरी लावत असतात. परंतु परदेशी पर्यटक विद्यार्थ्यांनी हजेरी लावत गडाची पाहणी केली. साऊथ क्रॉस युनिव्हर्सिटी ऑफ ऑस्ट्रेलिया येथील २५ ते ३० पर्यटकांनी भेट दिली.

गडावरील श्री सिद्धेश्वर मंदिर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची माहिती जाणून घेतली. गडावरील पुरातन वास्तू, दगडी बांधकाम, बाहेर पडण्याचा चोर दरवाजा, तसेच जगातील सर्वात मोठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, किल्ल्याचे सुशोभीकरण व स्वच्छता पाहून हे विदेशी पर्यटक भारावून गेले. तीन तास विदेशी पर्यटकांनी गडावरती पर्यटनाचा आनंद लुटला. यावेळी स्थानिक नागरिकही उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article