बेळगाव : बेळगाव विमानतळाच्या प्रवासी संख्येमध्ये गेल्या ऑगस्ट 2024 महिन्यात 8.3 टक्क्यांनी घट झाली असून ऑगस्टमध्ये 25,522 प्रवाशांनी बेळगावहून हवाई प्रवास केला आहे.
बेळगाव विमानतळावरून जुलै महिन्यात 27,860 प्रवाशांनी हवाई प्रवास केला होता. या तुलनेत ऑगस्ट महिन्यात कमी प्रवाशांनी बेळगावहून हवाई प्रवास केला आहे.
प्रवासी संख्येतील ही 8.3 टक्के इतकी घट बेळगाव विमानतळावरून जोधपुर, सुरत आणि किशनघर या ठिकाणी असलेल्या विमान सेवा रद्द करण्यात आल्यामुळे झाली आहे. इंडिगो आणि स्टार एअर या दोन एअरलाइन्सच्या विमानसेवेच्या माध्यमातून आजच्या घडीला बेळगाव एकूण 8 शहरांना जोडले गेले आहे.
यापैकी बेंगलोर (दोन), नवी दिल्ली आणि हैदराबाद अशा तीन मार्गावर इंडिगो एअरलाइन्सची सेवा, तर अहमदाबाद, मुंबई, नागपूर, जयपूर आणि तिरुपती या पाच मार्गांवर स्टार एअरलाइन्सची सेवा सध्या कार्यरत आहे.
बेळगाव विमानतळाची पॅसेंजर क्षमता वाढवणे आणि बेळगाव विमानतळाला अच्छे दिन आणणे यासाठी बेळगावच्या खासदारांसमोर मोठे आव्हान आहे यासाठी आगामी काळात बेळगाव शहरापासून नवीन विमानसेवा सुरू करणे हेच महत्त्वाच काम असणार आहे.