बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यपीठाअंतर्गत येणाऱ्या पदवी महाविद्यालयांचे पुढील शैक्षणिक वर्ष १ ऑगस्टपासून सुरु होणार असल्याचे पत्रक विद्यापीठाने गेले शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी काढले होते.
मात्र, गत सेमीस्टरच्या परीक्षा होण्यास विलंब झाल्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षाला सप्टेंबरपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष तब्बल तीन महिने पुढे ढकलले आहे. हे शैक्षणिक वर्ष रुळावर आणण्यास विद्यापीठाला कसरत करावी लागणार आहे.
सोवारी पासून शालेय शिक्षण अभ्याक्रमाला सुरुवात झाली. मात्र, पदवीच्या चौथ्या व सहाव्या सेमीस्टरचे वर्ग आता सुरु झाले आहेत. तसेच पहिल्या सेमिस्टरच्या परीक्षा सुरु असून दुसऱ्या सेमिस्टरलाही लवकरच सुरुवात होणार आहे. कोणतेही वर्ग तीन महिने चालणे गरजेचे आहेत. यामुळे एप्रिल ते जुलैपर्यंत पदवीचे वर्ग चालतील. त्यानंतर ऑगस्टमध्ये शेवटच्या सेमीस्टरच्या परीक्षा होतील. त्यानंतर सप्टेंबरपासून पुढील शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार सद्या पदवीच्या प्रथम वर्षातील परीक्षा सुरु आहेत. २३ मे पर्यंत या परीक्षा चालणार आहेत. लगेचच २५ मे पासून यांचे वर्गही सुरु होण्याची शक्यता आहे. त्यानंतर यांचेही वर्ग तीन महिने चालणार व परीक्षा प्रक्रिया होईल.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून पदवी महाविद्यालयांच्या वेळापत्रकात मोठा बदल झाला आहे. दरवर्षी जुन-जुलै महिन्यात शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ होतो. मात्र, यावेळी सप्टेंबर महिना उजाडणार आहे. तब्बल तीन महिने उशीराने महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. पदवीचे शैक्षणिक वर्ष रुळावर आणण्यासाठी विद्यापीठ व महाविद्यालयांना कसरत करावी लागणार आहे.
विद्यापीठाने गेले शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी एक पत्रक काढले होते. यानुसार पदवीच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षांच्या सेमीस्टरचे नियोजन केले होते. त्यानुसार पदवीच्या दुसऱ्या, तिसऱ्या व सहाव्या सेमीस्टरच्या वर्गांना १ मार्चपासून सुरुवात होणार असल्याचे म्हटले होते. मात्र, दुसऱ्या व तिसऱ्या सेमीस्टरचे वर्ग १८ एप्रिलपासून म्हणजेच दिड महिना उशीरा सुरु झाले आहेत. तसेच अध्यापही पहिल्या वर्षाचे वर्ग सुरु झालेले नाहीत. तसेच १ ऑगस्ट २०२२ पासून शैक्षणिक वर्ष सुरु होईल, असेही म्हटले होते. मात्र, येत्या दोन महिन्यात, अभ्यासक्रम, परीक्षा, प्रायोगिक परीक्षा, मुल्यमापन, मध्यावती सुट्टी असल्याने
ऑगस्टपासून शैक्षणिक वर्ष सुरु होण्याची शक्यता कमी आहे. यामुळे पुढील सेमीस्टर सप्टेंबरपासून सुरु होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.
– नंदिनी जी.