बेळगाव : आज दिनांक 24/07/2023 रोजी बेक्किनकेरे ग्राम पंचायत येथे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक संपन्न झाली.अध्यक्षपदी सौ. छगुबाई शंकर कांबळे व उपाध्यक्षपदी सौ. लक्ष्मी सोमनाथ सावंत यांची निवड झाली आहे.या विजयाने ग्राम पंचायत वरील भारतीय जनता पार्टी चे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले.
विजय झाल्यानंतर नूतन अध्यक्ष-उपाध्यक्ष यांनी भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ कार्यालय विजय नगर येथे सदिच्छा भेट दिली याप्रसंगी भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्री धनंजय जाधव यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा शाल व हार घालून सत्कार केला व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कोणत्याही राजकीय दडपणाला व अमिषाला बळी न पडता बेक्किनकेरे ग्राम पंचायत हा बालेकिल्ला भाजपाने अभाधित ठेवल्या बद्दल सर्व ग्राम पंचायत सदस्य व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले.
या प्रसंगी बेक्किनकेरे ग्राम पंचायत सदस्य, प्रमुख कार्यकर्ते तसेच यल्लपा गावडे, अर्जुन डोंबले, सुरेश सावंत, परशुराम भातकांडे, गंगाराम कृष्णा सावंत, गंगुबाई गावडे, अजित हलकर्णी, विलास तशीलदार, गुरुराज हलगत्ती, मंथन सुतार, भाग्यश्री कोकितकर, लक्ष्मी परमेकर, लता उसुलकर, आदीसह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.