Baba Vanga’s Scary Predictions 2025 : नवीन वर्षाच्या आगमनाला अवघे काहीच तास शिल्लक आहेत. प्रत्येकजण नव वर्षाचे उत्साहात, जल्लोषात स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत, यासाठी अनेक प्लॅन्स तयार केले जात आहे. दरम्यान नवीन वर्ष चांगलं जाण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहेत. मात्र 2025 वर्षाबाबत काही भीतीदायक भविष्यावाणी करण्यात आली आहे. बाबा वेंगा आणि नॉस्ट्राडेमस त्यांच्या आश्चर्यकारक आणि अचूक भविष्यवाणीसाठी ओळखले जातात. त्यांनी आत्तापर्यंत मानवाचा एलियन्सशी असलेला संपर्क, व्लादिमीर पुतिन यांच्यावरील हत्येचा प्रयत्न, युरोपमधील दहशतवादी हल्ले आणि राजा चार्ल्सची अशांत राजवट यांसारख्या अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. या पलीकडे दोघांनी 2025 बाबतही काही भविष्यवाण्या केल्या आहेत ते पाहूयात….
बाबा वेंगा आणि नॉस्ट्राडेमस यांनी 2025 साली युरोपमध्ये विनाशकारी संघर्ष होऊ शकतो अशी भविष्यवाणी केली होती. त्यानुसार मोठा संघर्ष झाल्याचेही पाहायला मिळाले, यात आता 2025 च्या सुरुवातीला पुन्हा एकदा असेच अंदाज बांधतले जात आहेत. मात्र हे वर्ष ब्रिटनसाठी अशुभ ठरणारे असेल असाही अंदाज आता व्यक्त करण्यात येत आहे.
बल्गेरियातील रहिवासी बाबा वेंगा हे अंध होते, ज्यांचे 1996 मध्ये निधन झाले. 9/11 चा हल्ला, राजकुमारी डायनाचा मृत्यू, चेरनोबिल आपत्ती आणि ब्रेक्झिट यांसारख्या महत्त्वाच्या जागतिक घटनांचे भाकीत त्यांनी केले होते. त्यांच्याप्रमाणे फ्रेंचमधील नॉस्ट्राडेमस यांनीही याबाबत अचूक भाकिते करुन सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते.
बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, एक विनाशकारी युद्धामुळे संपूर्ण युरोप देश उद्ध्वस्त होणार आहे, यामुळे संपूर्ण युरोप खंडच नष्ट होऊ शकतो. तसेच रशिया केवळ टिकणार नाही तर जगावर वर्चस्व गाजवेल. युक्रेनविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारचा अंदाज अधिकच अस्वस्थ करणारा आणि धडकी भरवणारा आहे. याशिवाय अनेक नैसर्गिक आपत्तींविषयी देखील त्यांनी भाकीत केलं आहे. ज्यात अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील विनाशकारी भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक याबाबतही त्यांनी भविष्यवाण्या केल्या आहेत.
फ्रेंच ज्योतिषी आणि वैद्य नॉस्ट्रॅडॅमस यांनी आपल्या 16 व्या शतकातील ‘लेस प्रोफेसीज’ या पुस्तकात अशुभ भविष्यवाण्या लिहिल्या होत्या. त्यांच्या मते, युरोप स्वतःच्या सीमेत सुरू होणाऱ्या क्रूर युद्धांमध्ये व्यस्त राहील, ज्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे शत्रू निर्माण होतील. यामुळे युरोपाला विनाशकारी युद्धाला देखील सामोरे जावे लागू शकते.
दरम्यान 2025 साठी नॉस्ट्रॅडेमस यांनी आणखी काही भीतीदायक भाकीत केले आहे. विनाशकारी युद्ध आणि साथीच्या आजारानंतर ब्रिटन उद्ध्वस्त होईल असे भाकीत त्यांनी केले आहे. तसेच भूतकाळातील भयंकर महामारी पुन्हा येऊ शकते असाही इशारा दिला आहे.
नॉस्ट्राडेमस यांनी 2025 हे निर्णायक वर्ष देखील ठरु शकते असे भाकीत केले आहे. ज्यामध्ये पाश्चात्य शक्तींचा प्रभाव कमी होईल आणि नवीन जागतिक शक्तींचा उदय होईल. प्रदीर्घ काळ चाललेले युद्ध संपेल आणि सैनिकही युद्धाला कंटाळतील असे भाकीत त्यांनी केले.