बेळगाव : कर्नाटक राज्यात तीन ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारल्या नंतर बेळगावमधील काँग्रेस भवन समोर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना जिल्हा पालक मंत्री तथा सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सतीश जारकीहोळी यांनी या विजयासाठी “आयुर्वेदिक औषधासारखी” रणनीती वापरल्याचे सांगितले.
सतीश जारकीहोळी पुढे म्हणाले, काँग्रेसच्या विजयामागे सरकारची विकासकामे, हमीभाव योजना आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा मोठा वाटा आहे. याचप्रमाणे नेतृत्वाची दिशा, अहिंद मतांचे सामर्थ्य आणि कार्यकर्त्यांचा परिश्रम यामुळे काँग्रेसने तिन्ही मतदारसंघात विजय मिळवला.
राज्यात सर्वत्र आमच्या मॉडेलप्रमाणे निवडणुका झाल्या, तर काँग्रेसला निश्चित विजय मिळेल.” वक्फचा निवडणुकीवर होणारा परिणाम नकारात्मक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिग्गावीत 650 जणांना नोटिसा आल्या, त्यात फक्त 150 हिंदू होते, बाकी सर्व मुस्लिम शेतकरी होते. वक्फ विरोधात कायदा लागू असल्याचे ते म्हणाले
आगामी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीबद्दल, जारकीहोळी यांनी इव्हीएम मशीन्स संदर्भात डावपेच सुरू असल्याचा इशारा दिला. याप्रकरणी गिव्ह अँड टेक धोरणाचा वापर करण्यात येईल, असे ते म्हणाले.
महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली एआयसीसी अधिवेशनाच्या शताब्दी वर्षानिमित्त बेळगावात गांधी भारत कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा उपस्थित असतील, अशी माहिती जारकीहोळी यांनी दिली.
राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर, बेळगाव येथील काँग्रेस भवनासमोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाई वाटून भव्य विजयोत्सव साजरा केला.