काकती : मार्कंडेया सहकारी साखर कारखाना लि. काकती बेळगाव व्यवस्थापक मंडळाची निवडणूक रविवार दिनांक 27.8.2023 रोजी होणार आहे. 2019-20 ला जेव्हा साखर कारखाना सुरू केला त्याच वेळी अविनाश राम भावू पोतादार पॅनेलच्या वतीने विकासाला सुरुवात केली होती.
कारखाना अजून बाल्यावस्थेत असून विकासाची अनेक कामं व्हायला हवेत. तीन वर्षांपासून कारखान्याच्या विकासासाठी प्रयत्न करत आहोत, आता आणखी काम व्हायला हवे, असे सांगत अविनाश रामभावू यांनी पोतदार पॅनेलला मतदान करण्याची विनंती केली.