बेळगाव : संतोष दरेकर आणि सुनील धोंगडी यांनी आज मास्टर प्रेम बुरुड यांना स्पोर्ट शूज 2 पेअर, स्किपिंग रोप, सॉक्स, स्पोर्ट ट्रॅक सूट भेट दिला. तो बेळगाव येथील कावळेवाडी येथील सरकारी शाळेत ७ वी मध्ये शिकणारा विद्यार्थी आहे. तो अत्यंत गरजू कौटुंबिक पार्श्वभूमीतून आला आहे .कर्नाटक राज्य पोलिसात भरती होऊन क्रीडा क्षेत्रात भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे त्याचे स्वप्न आहे .
काही दिवसांपूर्वी तो 100 मीटर आणि 400 मीटर धावण्यात तालुकास्तरावर पहिला आला आणि त्याची जिल्हा क्रीडासाठी निवड झाली. डीसीपी विक्रम आमटे हे त्यांचे आदर्श आहेत जे काही वर्षांपूर्वी बेळगावहून शिमोगा येथे पोस्टिंग झाले होते. प्रेम बुरुड यांना सरप्राईज गिफ्ट देण्यासाठी आम्ही आमच्या बेळगावचे डी सी श्री नितेश पाटील सर यांच्याकडून स्पेशल अपॉइंटमेंट घेतली होती. DC नितेश पाटील सरांनी आमच्या छोट्या धावपटूला प्रोत्साहन आणि प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद. पाहुणे श्री यल्लप्पा बुरड (वडील), श्री वाय पी नाईक, रवळनाथ कणबरकर पैलवान उपस्थित होते.