हिंदुराष्ट्र सेना बेळगाव जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर यांच्यावर हिंडलगा येथे गोळीबार झाला. अज्ञाताने अचानक पणे समोरून येऊन गोळीबार केल्याने ते जागीच खाली पडले अशा अवस्थेत असताना जवळपास असलेल्या नागरिकांनी तातडीने रवी यांना केएलई हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.
सध्या त्यांची तब्येत चिंताजनक आहे .रविवारी बेळगाव येथील संभाजी विद्यान येथे हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने धर्म सभेचे आयोजन करण्यात आले होते, या सभेसाठी श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक सह इतर नेतेमंडळी या सभेला उपस्थित राहणार आहेत. हिंदू संघटनेच्या हिंदू संघटनेची सभा यशस्वी होऊ नये यासाठी म्हणूनच हा कट रचला असावा की काय असेच बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हिंदू राष्ट्र सेनेचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष हे आपल्या कार मधून हिंडलगा मध्ये प्रवेश करणार होते त्या क्षणी दोन चाकी वाहनावरून अज्ञात दोघेजण शूटर आले आणि त्यांच्यावर गोळीबार केला, ही गोळी रवी कोकितकर व बाजूला बसलेल्या ड्रायव्हरला देखील लागली असल्याचे समजते.
सध्या रवी कोकितकर यांची तब्येत चिंताजनक आहे. बेळगाव येथील केएलई हॉस्पिटल येथे तातडीने त्यांना दाखल करण्यात आले यावेळी हिंदू प्रेमी व रवी कोकितकर यांचे स्नेहीत मोठ्या संख्येने केएलई हॉस्पिटल समोर जमा झाल्याचे दिसत होते अखेर यांच्यावर प्राणघाती हल्ला कशासाठी केला यावर मात्र अद्याप माहिती मिळू शकली नाही.