Sameer Wankhede Will Join Shiv Sena Eknath Shinde : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आता हायप्रोफाईल अधिकाऱ्याची एन्ट्री होणार आहे. हायप्रोफाईल आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील चर्चित माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे आता महायुतीकडून निवडणूक लढवणार आहेत. पुढच्या दोन दिवसात समीर वानखेडे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असून त्यांची उमेदवारीही जाहीर करण्यात येणार आहे.
हायप्रोफाईल अधिकारी निवडणुकीच्या रिंगणात
समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. क्रांती रेडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही बातमी खरी असल्याचं सांगत लवकरच पक्षप्रवेशाबाबत निर्णय होईल असं म्हटलं आहे. समीर वानखेडे यांचा शिवसेना शिंदे गटात लवकरच प्रवेश होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
हायप्रोफाईल अधिकारी समीर वानखेडे निवडणूक लढवणार
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांची मोठी तयारीदेखील सुरु झाली आहे. यामध्ये चर्चित समीर वानखेडे यांचंही नाव समोर येत आहे. समीर वानखेडे महायुतीकडून निवडणूक लढवणार असल्याची माहिती त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी दिली आहे. येत्या दोन दिवसात यासंदर्भात मोठी निर्णय होईल आणि लवकरच त्यांची उमेदवारी जाहीर होईल, असं क्रांती रेडकर हिने सांगितलं आहे.
आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे समीर वानखेडे चर्चेत
समीर वानखेडे मुंबईतून महायुतीकडून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आल्याने , समीर वानखेडे सध्या चेन्नईमध्ये एनसीबी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक होते, त्यानंतर त्यांचं चेन्नईमध्ये ट्रान्सफर करण्यात आलं.
‘या’ कारणामुळे राजकारणात एन्ट्री
समीर वानखेडे यांना समाजकारणात रस आहे. गेल्या काही वर्षांपासून ते समाजकारणात कार्यरत आहेत. त्यांनी अंमली पदार्थविरोधी मोहिम राबवली आहे. मुंबई आणि चेन्नईमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ड्रग्सविरोधी मोहिम राबवत ते अंमली पदार्थांविरोधात समाजाला जागृत करण्याचं काम करत आहेत. मुंबईतील तरुणांना अंमली पदार्थांपासून वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राजकारणात येऊन हे काम आणखी चांगल्या पद्धतीने करण्याचा त्यांचा उद्देश असल्याने ते आता राजकारणात एन्ट्री घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.