Ad imageAd image

“कुटुंबातील इतर सदस्य…”, पती सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल करीना कपूरची पहिली प्रतिक्रिया!

ratnakar
“कुटुंबातील इतर सदस्य…”, पती सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल करीना कपूरची पहिली प्रतिक्रिया!
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kareena Kapoor Khan on Saif Ali Khan Attack : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर दरोडेखोराने हल्ला केला. गुरुवारी मध्यरात्री २.३० वाजता मुंबईतील वांद्रे (पश्चिम) येथे त्याच्या घरात ही घटना घडली. यावेळी सैफची दरोडेखोराबरोबर झटापट झाली. दरोडेखोराने चाकूने वार केले, ज्यात सैफच्या हाताला व मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. या प्रकरणी सैफची पत्नी अभिनेत्री करीना कपूर खानने प्रतिक्रिया दिली आहे.
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी करीना कपूर खानच्या टीमने अधिकृत निवेदन दिले आहे. “रात्री सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्या घरी घरफोडीचा प्रयत्न झाला. सैफला दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुटुंबातील इतर सदस्य सुरक्षित आहेत. आम्ही मीडिया आणि चाहत्यांना याप्रकरणी संयम बाळगण्याची विनंती करतो, तसेच या प्रकरणी कोणत्याही अफवा पसरवू नये, कारण पोलीस तपास करत आहेत. काळजीबद्दल सर्वांचे आभार,” असं करीना कपूर खानच्या टीमने निवेदनात म्हटलं आहे.

सैफ अली खानला पहाटे ३.३० वाजता लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. दरोडेखोराने केलेल्या हल्ल्यात त्याला सहा जखमा झाल्या, त्यापैकी दोन जखमा खोल आहेत. एक जखम त्याच्या मणक्याजवळ झाली आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. सैफवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया झाली असून सध्या तो रिकव्हरी रूममध्ये आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी रात्री अभिनेता सैफ अली खानच्या घरात एक अज्ञात माणूस घुसला, त्याने त्याच्या घरात काम करणाऱ्या गृहसेविकेबरोबर वाद घातला. नंतर सैफने हस्तक्षेप करून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने सैफवर हल्ला केला. या घटनेत सैफ जखमी झाला आहे, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या हल्ल्यात सैफच्या कुटुंबातील इतर सदस्य सुरक्षित आहेत. सध्या मुंबई पोलीस वेगाने या प्रकरणाचा तपास करत असून सैफ अली खानच्या घरी पोलिसांचे एक पथक पोहोचले आहे. सैफ व करीनाच्या घराजवळचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article