झोपडपट्टी भागात लवकरच घरे बांधून देणार आमदार अनिल बेनके आज आमदार अनिल बेनके यांनी झोपडपट्टी भागाला भेट दिली आणि तेथे असलेल्या जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी शहरातील वंटमुरी आणि वैभव नगर येथे नागरिकांच्या झोपडपट्टीची पाहणी करून त्यांना लवकरात लवकर घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले.
सध्या पावसाळ्याला सुरुवात झाल्याने झोपडपट्टी भागात दलदलीचे साम्राज्य निर्माण होऊ नये तसेच त्यांना कोणत्याही आजाराला सामोरे जावे लागू नये याकरिता झोपडपट्टी विभागाला भेट देऊन त्यांनी पाहणी केली.
यावेळी त्यांच्या समवेत झोपडपट्टी विकास विभागाचे अधिकारी लमानी, महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी, नगरसेवक राजशेखर डोनी, लक्ष्मी राठोड चिखलदिनी आदी उपस्थित होते.