बेळगावातील खाजगी हॉस्पिटल पेक्षा जिल्हा रुग्णालय येथे करण्यात नव्याने बांधण्यात आलेले शिशुविहार हे कित्येक हजार पटीने उत्तम असल्याचे मत उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी व्यक्त केले. निमित्त होते ते बीम्स हॉस्पिटलमध्ये नव्याने उभ्या करण्यात आलेल्या शिशुविहार वार्डाच्या उद्घाटन होय.
यावेळी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते फीत कापून या वार्डाचे उद्घाटन करण्यात आले. नंतर आमदार बेनके यांनी या ठिकाणी असलेल्या वार्डांची माहिती दिली या ठिकाणी मोबाईल बँक,काउंटर बिलिंग, यासह अनेक वॉर्ड सेवेकरिता सज्ज झाले असल्याचे आमदारांनी सांगितले.
देशात बारावा नंबर हा आपल्या बीम्स इस्पितळाचा लागतो या ठिकाणी रुग्णांकरिता आत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आहेत. त्याशिवाय आता या ठिकाणी शिशु विहार मदर अँड चाइल्ड ट्रॉमा सेंटर सुरू करण्यात आले आहेत.या ठिकाणी शिशुविहार मध्ये चिमुकल्यांवर लवकर उपचार व्हावे तसेच त्यांना उपचारादरम्यान विरंगुळा मिळावा याकरिता भिंतीवर वेगवेगळी चित्र रेखाटण्यात आली आहेत.
त्या शिवाय पडदे उशी बेडशीट याही लहान मुलांच्या खेळण्याप्रमाणेच रंगबिरंगी ठेवणे आले आहेत. तसेच येत्या काळात आमदार अनिल बेनके यांच्या प्रयत्नातून वेगवेगळे चार प्रकल्प हाती घेण्यात यातून ते लवकरच सुरू होतील. असा विश्वास उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी व्यक्त केला आहे. तसेच बीम्सचे प्रशासकीय संचालक आदित्य बिस्वास हे या प्रकरणी जातीने लक्ष घालत असून बीम्स हॉस्पिटल हे देशात पाचव्या क्रमांकावर असेल अशी आशा आमदार अनिल बेनके यांनी यावेळी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली आहे.
यावेळी उद्घाटनाप्रसंगी बीम्सचे संचालक आदित्य आमलान बिस्वास, उत्तरचे आमदार अनिल बेनके ,नगरसेवक मुरगेंद्रगौडा पाटील,श्रेयश नाकाडी, प्रवीण पाटील यांच्यासह बिम्सचे कर्मचारी डॉक्टर नर्स यांच्यासह नागरिक देखील उपस्थित होते.