Ad imageAd image

अमन सेहरावतने जिंकलं कांस्यपदक,भारताला मिळालं पॅरिस ऑलिम्पिकमधील सहावं पदक

ratnakar
अमन सेहरावतने जिंकलं कांस्यपदक,भारताला मिळालं पॅरिस ऑलिम्पिकमधील सहावं पदक
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Paris Olympic 2024  : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ९ ऑगस्टला भारताने सहावं ऑलिम्पिक पदक जिंकलं आहे. भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावतने कुस्तीत यंदाच्या ऑलिम्पिकमधील पदक जिंकत परंपरा कायम ठेवली. भारताच्या हॉकी संघाने कांस्य पदक तर गोल्डन बॉय नीरज चोप्राने रौप्यपदकाला गवसणी घातली. आता यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताची ६ पदकं झाली आहेत. याशिवाय, महिला आणि पुरुषांच्या ४x४०० रिलेचे हीट होते. पण दोन्ही संघांना पुढील फेरीत स्थान मिळवणे शक्य झाले नाही.

भारताला आतापर्यंत मिळालेली ऑलिम्पिक पदके:

याशिवाय अतिरिक्त वजनामुळे भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आले होते. यानंतर विनेशने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादामध्ये तिला रौप्यपदक मिळावे अशी तिने याचिका दाखल केली. यासंबंधित ऑलिम्पिक संपेपर्यंत निर्णय देऊ असे क्रीडा लवादाने निवेदन जारी करत सांगितले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article