Ad imageAd image

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका; गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मकोका…

ratnakar
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका; गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मकोका…
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर आता मकोका लावण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे सुतोवाच काही दिवासंपूर्वीच केले होते. संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून दहशत निर्माण केल्याच्या पार्श्वभूमीवर या कायद्याअंतर्गत आता कारवाई होणार आहे. आरोपी प्रतीक घुले, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, जयराम चाटे आणि महेश केदार यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. तर या हत्या प्रकरणात सिद्धार्थ सोनवणेलाही आरोपी करण्यात आले आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरण गेल्या महिन्यापासून चर्चेत आहेच. 9 डिसेंबरला बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांना अत्यंत क्रूर पद्धतीने ठार करण्यात आले होते. या प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह बीडमधील लोकप्रतिनिधी आवाज उठवत होते.

वाल्मिक कराडचे काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर सर्व विरोधक आरोप करत आहेत. मात्र त्यांच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे त्याला मकोकाच्या बाहेर ठेवले गेले आहे. तसेच कृष्णा आंधळे हा आरोपीही अद्याप फरार असून त्याला अटक करण्यात पोलिसांना अजूनही यश आलेले नाही.

मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केले होते – धस
संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मकोका कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात येतो. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. सरकारी वकिलांनीही ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सर्व आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. मकोका लागल्यानंतर आमदार सुरेश धस म्हणाले की, यात काहीही नवीन नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातच याची घोषणा केली होती, त्याप्रमाणे मकोका लावला गेला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article