बेळगाव : क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या जन्मदिनाच्या औचित्य साधून नंदगड येथून पायी ज्योत होन्नूर कडे रवाना झाली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्व समाजातील युवक एकत्र येऊन क्रांतिवीर संगोळी रायण्णा ज्योत तेही चालत होन्नूर कडे गेले.
आठ वर्ष सतत जन्मदिनानिमित्त व स्वातंत्र्य दिनाचे अवचित साधून हे सारे युवक नंदगड पासून ज्योत काढतात ही ज्योत नंदगड खानापूर यानंतर बेळगाव येथे आल्यानंतर कित्तूर राणी चन्नम्मा पुतळ्याला पाच फेऱ्या घालून पुन्हा ही ज्योत पुढे निघाले यावेळी युवकांनी बोलताना अधिक माहिती दिली मेडिकल जवळ असलेल्या होन्नूर गावातील क्रांतिवीर संगोळी रायान्ना यांच्या मूर्ती समोर 15 ऑगस्ट रोजी तिरंगा ध्वज फडकून देशाचा स्वाभिमान कायम राखण्याचे काम केले जाते असेही यावेळी सांगितले सतत दोन दिवस चालत प्रवास करून एक देशाचा क्रांतीकारक संगोळी रायान्ना यांचा स्वाभिमान बाळगणाऱ्या या युवकांनी हे ज्योत अखंड तेवत ठेवण्याचे काम कायम ठेवले आहे.