Ad imageAd image

स्वस्त तेच मस्त म्हणाव लागेल , BSNL चा एअरटेल आणि जिओला झटका …

ratnakar
स्वस्त तेच मस्त म्हणाव लागेल , BSNL चा एअरटेल आणि जिओला झटका …
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

स्वस्त तेच मस्त म्हणाव लागेल , BSNL चा एअरटेल आणि जिओला झटका …
सरकारी टेलिकॉम कंपनी इंडिया संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलचे ग्राहक वाढत आहेत. यावर्षी जुलै महिन्यात भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओसारख्या बड्या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या टॅरिफमध्ये वाढ केली होती. यानंतर या कंपन्यांचे अनेक ग्राहक बीएसएनएलशी जोडले गेले आहेत.

टेलिकॉम रेग्युलेटर TRAI च्या अहवालानुसार, बीएसएनएलने ऑगस्टमध्ये जवळपास 25 लाख नवे ग्राहक जोडले आहेत. मात्र, भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओने अनुक्रमे 24 लाख आणि सुमारे 40 लाख ग्राहक गमावले. बीएसएनएलने जुलैमध्ये सुमारे 30 लाख नवे ग्राहक मिळवले आहेत. मात्र, असे असूनही खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत कंपनीचा मार्केट शेअर खूपच कमी आहे.
रिलायन्स जिओचा मार्केट शेअर सुमारे 40.5 टक्के आणि भारती एअरटेलचा सुमारे 33 टक्के आहे. या मार्केटमध्ये बीएसएनएलचा वाटा सुमारे 7.8 टक्के आहे. कमी दरांमुळे कंपनीला नवीन ग्राहक मिळत आहेत.

बीएसएनएलचे सिमकार्डही सहज उपलब्ध होणार आहे. त्यासाठी कंपनीने एटीएमसारखी मशिन बसविण्याची योजना आखली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये या मशिनचे प्रदर्शन करण्यात आले होते. यामुळे बीएसएनएल युजर्स या मशिन किंवा सेल्फ केअर अ‍ॅप्सच्या माध्यमातून सिमकार्ड घेऊ शकणार आहेत.

बीएसएनएलने आपल्या मोबाईल नेटवर्कवरील स्पॅम कॉल ब्लॉक करण्याची योजना आखली आहे. स्पॅम कॉलचा सामना करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि मशीन लर्निंगशी (एमएल) संबंधित सोल्यूशन्सचा वापर केला जाईल. टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) स्पॅम कॉलवर ही कडक कारवाई सुरू केली आहे.

बीएसएनएलनेही कमी किंमतीच्या मोबाइल सेगमेंटमध्ये उतरण्याची तयारी केली आहे. कंपनीने कार्बन मोबाइल्ससोबत भागीदारी करून एक्सक्लुझिव्ह सिम हँडसेट बंडलिंग ऑफर आणली आहे. हे हँडसेट जिओ भारत 4G फीचर फोनला टक्कर देतील. यामुळे युजर्सला कंपनीची 4G सेवा वापरण्यासाठी महागडे स्मार्टफोन खरेदी करावे लागणार नाहीत.

बीएसएनएल युजर्स मशिन किंवा सेल्फ केअर अ‍ॅप्सच्या माध्यमातून सिमकार्ड घेऊ शकणार असल्याने युजर्सला ते सहज शक्य होणार आहे. तसेच स्वस्त प्लॅन्सचाही लाभ घेता येईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article