Ad imageAd image

कोनवडे येथे मुले पळवणारा समजून अगरबत्ती विक्रेत्याला बेदम मारहाण

ratnakar
कोनवडे येथे मुले पळवणारा समजून अगरबत्ती विक्रेत्याला बेदम मारहाण
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोल्हापूर : अगरबत्ती विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी आलेल्या दोघा विक्रेत्याला मुले पळवणारे चोरटे समजून कोनवडे ता.भुदरगड  येथील ग्रामस्थांनी बेदम चोप देऊन भुदरगड पोलिसांच्या ताब्यात दिले. आज सकाळी ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, अगरबत्ती विकण्यासाठी राधानगरी तालुक्यातील चाळीस ते पन्नास वर्षे वयाचे दोन विक्रेते कोनवडे येथे आले होते. त्यातील पत्तीस ते चाळीस वर्षीस विक्रेता गावातील मध्यवर्ती ठिकाणी एका लहान मुलीवर रागावला. त्यामुळे ती मुलगी ओरडू लागली. ग्रामस्थांना नेमके काय झाले हे समजले नाही. त्यांनी त्याला मुले पळवून नेणारा चोरटा समजून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांना भुदरगड पोलिसांच्या ताब्यात दिले.

यातील एकजण नेहमी या गावात विक्रीसाठी येत असल्याने त्याची ओळख पटली. आज पहिल्यांदा त्याच्या सोबत दुसरा फिरस्ती आला होता. हा ओळखीचा असल्याने त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल न करता त्यांना सोडून देण्यात आले.

सकाळची वेळ असल्याने ग्रामस्थ काही वेळातच घटनेच्या ठिकाणी जमले. संबंधित फिरस्त्यांना चोप देत असताना येथूनच प्रवास करणारा तरुण या जमावात सामील झाला. फिरस्त्यातील तिसरा असल्याच्या गैरसमजातून या युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे ग्रामस्थांत चोर सोडून संन्यासास फाशी झाली अशी चर्चा रंगली होती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article