Ad imageAd image

दिल्ली अरविंद केजरीवाल जिंकतील”, पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये एकच खळबळ; काय म्हणाले…?

ratnakar
दिल्ली अरविंद केजरीवाल जिंकतील”, पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये एकच खळबळ; काय म्हणाले…?
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Former CM Prithivraj Chavan on Delhi Elections 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुक येत्या 5 फेब्रुवारी महिन्यात आहे. त्यावरून देशात राजकीय वातावरण तापले असून दिल्लीतील सत्तापालट होणार की आपचे वर्चस्व कायम राहील याकडे संबंध देशाचे लक्ष लागून राहिले आहे.विधानसभेच्या निमित्ताने इंडिया आघाडीत फूट पडली असून आप आणि काँग्रेस पक्ष स्वतंत्र निवडणुका लढवणार आहेत. दरम्यान, यातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी धक्कादायक विधान केलं होतं. या विधानावर आता त्यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे.

IANS ला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, “दिल्लीच्या निवडणुका फार महत्त्वाच्या आहेत. मला विश्वास आहे की तिथे अरविंद केजरीवाल जिंकतील. काँग्रेसही रिंगणात आहे आणि निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस आणि आपमध्ये युती व्हायला हवी होती. मात्र तसे होताना दिसत नाही”, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
त्यांच्या या वक्तव्यावर प्रचंड टीका झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या वक्तव्यवर खुलासा केला आहे. काँग्रेसकडूनही त्यांच्यावर टीका झाली. ते म्हणाले, “दिल्ली विधानसभा निवडणुकी बाबतच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. इंडिया आघाडी एकत्र लढली असती तर आघाडीचा विजय निश्चित झाला असता. आता सर्व प्रमुख पक्ष रिंगणात उतरल्याने खुली निवडणूक झाली आहे. काँग्रेस पक्षाला प्रचंड गती मिळाली आहे आणि मला खात्री आहे की आपण विजयी होऊ.”

अरविंद केजरीवाल यांना विरोधी इंडिया आघाडीतील दोन प्रमुख पक्ष समाजवादी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांचा पाठिंबा मिळाला आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव म्हणाले, जो कोणी भाजपाचा पराभव करेल आम्ही त्यांच्यासोबत आहोत. दिल्लीत काँग्रेसची संघटना मजबूत नाही, त्यामुळे सपा आपला पाठिंबा देईल. तृणमूल काँग्रेसनेही आपला पाठिंबा देत म्हटलं की, आशा आहे की केजरीवाल दिल्लीत पुन्हा सरकार स्थापन करेल.
काँग्रेस दिल्लीत युतीशिवाय निवडणूक लढवत आहे.2020 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अत्यंत खराब होती आणि यावेळीही त्यांच्यासमोर मोठं आव्हान आहे. आपला सपा आमि टीएमसीला पाठिंबा मिळाल्याने काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे. दुसरीकडे महाआघाडीतही काँग्रेसच्या नेतृत्त्वावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ममता बॅनर्जी, शरद पवार आणि लालूप्रसाद यादव यांच्यासारख्या नेत्यांचं म्हणणं आहे की आघाडीचे नेतृत्व काँग्रेसकडून काढून घेऊन ममता बॅनर्जींकडे सोपवले पाहिजे.

दिल्लीत 70 जागांवर 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 8 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. येथे भाजपा, आप आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. गेल्यावेळी आपने दिल्लीत दणदणीत विजय मिळवला होता. मात्र यावेळी कोणाचा विजय होतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article