माजी खासदार आणि अभिनेते परेश रावल गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचे स्टार प्रचारक आहेत. गुजरातचे लोक महागाई सहन करतील, मात्र बांगलादेशी आणि रोहिंग्यांना नाही,असे रावल यांनी म्हटले आहे.
या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोशल मीडियात ट्रोलिंग सुरू झाले आहे. परिणाम रावल यांना वलसाडमध्ये बांगलादेशींबाबतच्या वक्तव्यावर माफी मागावी लागली.
त्यांनी सांगितले की, बंगाली म्हणजे अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्यांशी होता. कुणी दुखावले असल्यास माफी मागतो. वलसाडमध्ये झालेल्या सभेत परेश रावल म्हणाले होते की, गॅस सिलिंडर महाग झाले, कधी ना कधी त्याची किंमत कमी होईल. लोकांना रोजगारही मिळेल.
मात्र, दिल्लीप्रमाणे रोहिंग्या आणि बांगलादेशी तुमच्याजवळ राहू लागल्यास काय होईल? बांगलादेशींसाठी मासे शिजवाल? एका युजरच्या आक्षेपानंतर त्यांनी लिहिले की, निश्चितच मासे हा मुद्दा नाही,कारण गुजरातमध्येही मासे शिजवतात ,खातात. मात्र, मी स्पष्ट करू इच्छितो की, बंगालीचा माझा अर्थ अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्याशी आहे.