Ad imageAd image

राजा राणी’ चित्रपटातील ‘थोडासा भाव देना’ रोमँटिक गाणं रिलीज

ratnakar
राजा राणी’ चित्रपटातील ‘थोडासा भाव देना’ रोमँटिक गाणं रिलीज
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राजा राणी’ चित्रपटातील ‘थोडासा भाव देना’ रोमँटिक गाणं रिलीज

सध्याचं युग हे प्रेमयुग म्हणून ओळखलं जातं, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. प्रियकर-प्रेयसी प्रेमाची कबुली देत एका अभूतपूर्व नात्यात अडकतात. या प्रेमीयुगुलांवर आधारीत वा त्यांना प्रोत्साहन देणारी अशी अनेक रोमँटिक गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली. अनेक प्रेमगीतांनी साऱ्यांच्या मनावर अधिराज्य केलं आणि आता या गाण्यांच्या पाठोपाठ आणखी एका रोमँटिक गाण्याने साऱ्या रसिकांच्या दिलाचा ठोका चुकविला आहे. ते गाणं आहे – ‘थोडासा भाव देना’. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या ‘राजा राणी’ या चित्रपटातील हे रोमँटिक गाणं साऱ्यांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज झालं आहे.

‘ राजा राणी ‘ हा चित्रपट १८ ऑक्टोबरपासून सिनेरसिकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपट येण्यापूर्वीच चित्रपटाच्या गावरान कथानकाने साऱ्यांची उत्सुकता वाढविली आहे. आता या पाठोपाठ चित्रपटातील मुख्य नायक व नायिकेभोवती फिरणाऱ्या कथेवरील गाण्याने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. प्रेयसीला मनवण्यासाठी प्रियकराचं अतोनात प्रेम या गाण्यातून पाहायला मिळतंय. या गाण्यात रोहन पाटील व वैष्णवी शिंदे यांचा रोमँटिक अंदाज विशेष भावतोय तर या गाण्यात आपल्या मित्राला पाठिंबा देताना ‘बिग बॉस’ फेम सूरज चव्हाण व तानाजी गलगुंडे दिसतोय.

‘राजा राणी’ चित्रपटातील ‘थोडासा भाव देना’ या गाण्याच्या संगीताची जबाबदारी पी. शंकरम यांनी तर पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे यांनी सांभाळली आहे. तर या सुंदर अशा गाण्याला हर्षवर्धन वावरे याने त्याच्या सुमधुर स्वरात स्वरबद्ध केलं आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे तर या गाण्याचे बोल गोवर्धन दोलताडे व दौलत जाधव यांनी लिहिले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article