गुरुवार दिनांक 15/4/2022… समाजाचे आपण ही काहीतरी देणे असते, म्हणुन कुठेतरी एक हात मदतीचा द्यावा लागतो. जुना गुडसशेड रोड गोडसे काॅलणी, बेळगाव. येथील “वन टच फाऊंडेशन” या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री विठ्ठल फोंडू पाटील यांना मोहनगा दड्डी येथील सामाजिक कार्यकर्त्यां सेंथिया फर्नांडिस यांचा एक फोन आला की, ईकडे एक सलमा हयातखान नामक मुस्लीम महिला अतिशय गरीब परिस्थितीत राहतेय. तिचा पती नाही, नातेवाईक नाहीत ,त्यांना दोन लहान मुले आहेत, त्या कुटुंबाकडे ना राशन कार्ड, ना आधार कार्ड, ना स्वतःचे घर, ना कोणी वाली, मी अनेक ठिकाणी मदतीची याचना केली, पण त्यांना कोणीच मदत देऊ केली नाही,
तेव्हा तुमच्याकडून काही मदत मिळू शकेल का.? लगेच पाटील यांनी हो देईन म्हणुन होकार दिला ,आणि वन टच फाऊंडेशनच्या महिला सदस्या सुप्रिता शेट्टी, वैशाली मोरे, माधुरी माळी, कु.वैष्णवी भातकांडे, कल्पना सावगावकर, वैशाली पाटील, धनश्री पाटील, या सर्व महिलांनी त्या कुटुंबाला तीन महिने पुरेल इतके, 50 किलो तांदूळ, तेल पाकिटे, साखर,चहा पावडर , पोहे, तिखट पाकीट,हळद पाकीट, मीठ, कांदे, तुरडाळ ,चनीडाळ, मूग, मटार, हरभरा,मसूर, बिस्किट पाकीट, साबण, व्हील पावडर, एक चादर , ईतके जीवनावश्यक आहारधान्य साहित्य स्वतःकडून जमा केले. आणि साक्षात माणुसकीचे दर्शन घडवून आणले.
हे सर्व साहित्य फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री विठ्ठल फोंडू पाटील, आणि कल्पना सावगावकर यांनी बेळगाव पासून जवळ जवळ 50 किलो मीटर अंतरवर दड्डी येथे जाऊन समक्ष भेटून त्यांना दिले . तेव्हा, हे सर्व साहित्य पाहून त्या महिलेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
त्यांनी त्यांचे आभार मानले. व फर्नांडिस यांनी जात पात न पाहता माणसाने माणसासाठी कशे धावून जायचे आणि जन सेवा कशी करावी हे वन टच फाऊंडेशन बेळगाव या संस्थेकडून शिकावे असे उदगार काढून मनोगत व्यक्त केले.आणि त्यांना शुभेच्छा दिल्या…