बेळगाव: शहरातील बसवन कुडची गावात आमदार अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली भव्य हळदी कुमकुम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी बसवन कुडची गावातील बसवन मंदिर प्रांगणात हळदी कुमकुम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दोन हजारांहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार अनिल बेनके म्हणाले की, मी आमदार होण्या-आधीपासून बसवन कुडची येथील जनतेने माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. 2018 ची निवडणूक लढवली तेव्हाही मला 100 टक्के मते मिळाली. मी आज कोणतेही आमिष दिलेले नाही आणि आज हळदी कुमकुम कार्यक्रमाला हजारो महिला आल्या असून खूप आनंद झाला आहे. बसवन कुडचीमध्ये 1 कोटी खर्चून शेतांना जोडणारा पूल बांधणे, कन्नड व मराठी शाळा बांधणे, 50 लाख खर्चून भिंत बांधणे, 15 लाख खर्चून अंगणवाडी, 20 लाख खर्चून स्मशानभूमी बांधणे, गावात 1 कोटीहून अधिक खर्चून रस्ते व गटार निर्माण, देवराज अरस कॉलनीमध्ये 3 कोटीहून अधिक खर्चून रस्त्यांचे काम, कर्नाटक हाऊसिंग बोर्ड जवळ रस्ते, पथदीप बसविणे यासोबत गावामध्ये मी आमदार झाल्यापासून जवळपास 10 कोटी हून अधिक विकासकामांना चालना दिले आहे अशी माहिती त्यांनी दिली.
बसवन कुडची येथे एक एकर जागा मिळताच ५ कोटी खर्च करून महिलांसाठी आरोग्य केंद्र उभारू. पैसे आधीच जाहीर झाले आहेत. मात्र तुम्ही जागा देताच आरोग्य केंद्र सुरू करू, असे आश्वासन त्यांनी दिले. येणाऱ्या काळात महिलांनी स्वावलंबी व्हायला हवे. त्यासाठी तुम्ही शिक्षण घ्या आणि तुमच्या मुलांनाही शिकवा. देशातील सर्वोच्च स्थान महिलांना दिले जाते. त्यामुळे तुम्हाला कोणतीही कमतरता नाही. महिलांनी सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक बसवराज मोदगेकर, लक्ष्मी मोदगेकर, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा बेडका, राधिका मुतगेकर, सुनंदा मुन्नोळी, रेखा सूर्यवंशी, वैशाली एकणेकर, सुजाता चौगला, निर्मला गिरी, रूपा चौगला, कांचना दिवटे, मंजुळा बेक्केडी, ज्योती बेडका, रजनी मोदगेकर आदी मान्यवर उपस्थित होते. जयशिला देसाई यांच्यासह हजारो महिला व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.