वन टच फाऊंडेशन ” एक हात मदतीचा….या सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून “कु.इशानवी ” हीचा वाढदिवस, आपणही समाजाचे काहीतरी देणे आहे, या उद्देशाने मल्लिकार्जुन जण सेवा सोसायटी संचालित “समाधान वृद्धाश्रम” शाहू नगर बेळगाव येथे, तेथील वयोवृद्ध आजी-आजोबांसोबत अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.आणि तेथील सर्व आजी आजोबांना फुलावा,लाडू, केक,वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला दरवंदर परिवार गोंधळी गल्ली, वन टच फाऊंडेशनच्या सदस्या सौ.माधुरी माळी, अध्यक्ष श्री.विठ्ठल फोंडू पाटील, सेक्रेटरी श्री.मनोहर बुक्याळकर, सदस्य श्री.ज्योतेश हुरूडे, उपस्थितीत होते. समाधान वृद्धाश्रम संस्थेचे संचालक अध्यक्ष खोत सर यांनी तसेच सर्व आजी आजोबांनी चिमुकलीला शुभाशीर्वाद देऊन आभार मानले.