Ad imageAd image

मोठ्या उद्योग समूहाकडून दरवर्षी कोट्यावधी रुपयांची मदत : रोटरी इंटरनॅशनल चे संचालक टी. एन. सुब्रमण्यम यांची माहिती

ratnakar
मोठ्या उद्योग समूहाकडून दरवर्षी कोट्यावधी रुपयांची मदत : रोटरी इंटरनॅशनल चे संचालक टी. एन. सुब्रमण्यम यांची माहिती
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : जगभरातून पोलिओ हद्दपार करण्यासाठी रोटरी क्लबकडून मोठे काम केले आहे. केवळ सेवाभाव आणि विश्वास यांच्या जोरावर रोटरी क्लबचे काम सुरू आहे. जगभरातून 17 संचालक निवडले जातात. त्यामध्ये भारतातून दोघांचा समावेश आहे. रोटरीच्या सदस्यत्वात भारत पहिल्या क्रमांकावर आहे अशी माहिती रोटरी इंटरनॅशनल चे संचालक टी. एन. सुब्रमण्यम यांनी दिली. बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आमचा सेवाभाव आणि पारदर्शक कारभार यामुळे जगभरातून कॉर्पोरेट कंपन्या आम्हाला संधी देत आहेत. आमचा खर्च अत्यल्प असल्यामुळे विविध कंपन्या आमच्या सोबत काम करण्यासाठी तयार आहेत. बिल गेट्स, बिर्ला यासारख्या अनेक मोठ्या उद्योग समूहाकडून दरवर्षी कोट्यावधी रुपयांची मदत रोटरीला होत असते. त्यातूनच आम्ही तळागाळातील समस्या दूर करत असतो.
संपूर्ण जगभर कार्यरत असलेल्या रोटरी क्लबकडून यावेळी पर्यावरण रक्षणावर काम सुरू झाले आहे. रोटरी क्लब मध्ये भारताचे स्थान पहिल्या क्रमांकावर असून सामाजिक सेवेत संपूर्ण आशिया खंडातच मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे असेही त्यांनी नमूद केलं

याशिवाय सेवा कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. शिक्षण, आरोग्य, शेती, पर्यावरण या क्षेत्रात रोटरीचे अव्यहतपणे काम सुरू आहे. यावेळी पर्यावरण रक्षणाचा मुद्दा घेऊन आम्ही कार्यरत आहोत. पर्यावरण रक्षणासाठी सप्तपदींची निवड केली आहे. वृक्षतोड थांबविणे वीज वाचविणे पाणी वाचविणे आदी विषयांवर तळागाळातून काम सुरू झाले आहे. याशिवाय भारतात शेतीचा विकास यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. इस्राईलच्या धरतीवर कृषी विकास करण्यासाठी शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येत आहे असेही ते म्हणाले.

यावेळी माजी प्रांतपाल अविनाश पोतदार यांनी रोटरीचा कामाबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यमान प्रांतपाल शरद पै यांनी बेळगाव, गोवा आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी रोटरीचे अशोक नाईक, सीए मनोज हुईलगोळ आदी उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article