Ad imageAd image

दोम्माराजू गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा नवा ‘राजा’, चीनच्या खेळाडूला ‘चेक मेट’; विश्वनाथन आनंदनंतर दुसरा विश्वविजेता

ratnakar
दोम्माराजू गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा नवा ‘राजा’, चीनच्या खेळाडूला ‘चेक मेट’; विश्वनाथन आनंदनंतर दुसरा विश्वविजेता
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : भारताचा दोम्माराजू गुकेश जागतिक बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता ठरला आहे. गुकेशने चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेनचा पराभव करत हा खिताब पटकावला आहे. डी गुकेश विश्वनाथन आनंदनंतरचा आता भारताचा दुसरा विश्वविजेता ठरला आहे. गुकेश हा केवळ 18 वर्षांचा असून तो जगातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे. गुकेशने या गॅरी कास्पोरोव्ह याचा विक्रमही मोडला. गुकेशची कामगिरी ही भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे.

गुकेश हा सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे. तसेच अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला. त्याच्या आधी विश्वनाथन आनंद 2012 मध्ये बुद्धिबळ चॅम्पियन बनला होता. गुकेशने याआधी वयाच्या 17 व्या वर्षी FIDE ही मानाची बुद्धिबळ स्पर्धाही जिंकली होती.  आता गुकेशने चीनच्या लिरेनचा 14 डावानंतर 7.5-6.5 अशा गुणांनी पराभव केला.

कोण आहे डी गुकेश?
डी गुकेश यांचे पूर्ण नाव दोम्माराजू गुकेश असून तो चेन्नईचा रहिवासी आहे. गुकेशचा जन्म 7 मे 2006 रोजी चेन्नई येथे झाला. त्याने वयाच्या 7 व्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. त्याला सुरुवातीला भास्कर नागय्या यांनी प्रशिक्षण दिले.

नागय्या हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळपटू आहेत तसेच ते चेन्नईमध्ये होम चेस ट्यूटर आहेत. त्यांच्यानंतर विश्वनाथन आनंदने गुकेशला खेळाची माहिती देण्याबरोबरच त्याला प्रशिक्षणही दिले. गुकेशचे वडील डॉक्टर असून आई व्यवसायाने मायक्रोबायोलॉजिस्ट आहे.

भारताच्या दोम्माराजू गुकेशने चीनच्या डिंग लिरेनविरुद्ध बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीत अखेरच्या 14 व्या डावात थरारक विजय मिळवला आणि जगज्जेतेपद खेचून आणले. त्याच्या या कौतुकास्पद कामगीरीला मानाचा मुजरा! अभिनंदन दोम्मराजू गुकेश.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article