Ad imageAd image

महाविकास आघाडीचा पराभव स्वीकारत उद्धव ठाकरेंची बोचरी टीका म्हणाले,“हा टोमणा नाहीय, पण अस्सल भाजपाचा मुख्यमंत्री …”

ratnakar
महाविकास आघाडीचा पराभव स्वीकारत उद्धव ठाकरेंची बोचरी टीका म्हणाले,“हा टोमणा नाहीय, पण अस्सल भाजपाचा मुख्यमंत्री …”
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Uddhav Thackeray On MVA Lost Maharashtra Election 2024 : राज्यात महायुतीची लाट आली असून भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे),राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांना स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचं चित्र आहे. दरम्यान, या महायुतीच्या लाटेत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना मिळून ५५ जागांवर आघाडी घेता आली आहे.

त्यामुळे या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधून मतदारांना उपरोधिक प्रश्न विचारला आहे. तसंच, भाजपावरही टीका केली आहे. “जणूकाही लाटेपेक्षा त्सुनामीच आली असल्याचं वातावरण दिसत आहे. सर्व सामान्य जनतेला पटलंय की नाही हा प्रश्न आहे. एकूण आकडे दिसत आहेत ते पाहिल्यावर सरकारला अधिवेशनात मंजुरीसाठी मांडण्याची गरजच नाही, असे आकडे आहेत. विरोधी पक्षच शिल्लक ठेवायचे नाहीत, असं त्यांनी ठरवलं आहे. भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा म्हणाले होते की फक्त एकच पक्ष राहील. त्यानुसार, देशाची वन नेशन वन पार्टी या दिशेने वाटचाल सुरू असल्याचं दिसतंय”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

जनतेला निकाल मान्य नसेल तर…
“आम्ही ज्या प्रचारसभा घेतल्या, हा निकाल म्हणजे लोकांनी महायुतीला मते का दिली? सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून, महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर जात आहेत म्हणून, महिलांना सुरक्षितता नाहीये म्हणून दिली की नेमकी कोणत्या रागापोटी ही लाट उसळली आहे हे कळत नाहीये. हा निकाल अनाकलनीय आहे, यामागंच गुपित शोधावं लागेल. आपण निराश होऊ नका, खचून जाऊ नका, हा ईव्हीएमचा विजय आहे, असू शकतो. महाराष्ट्राच्या जनतेला निकाल मान्य नसेलतर आम्ही प्राणपणाने लढत राहू. महाराष्ट्रातील जनतेला आम्ही वचन देतो की आम्ही लढत राहू”, असं आश्वासनही उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या मतदारांना दिलं.

अस्सल भाजपाचा मुख्यमंत्री होईल का?
पुढे ते म्हणाले की, “लाडकी बहीण योजनेचा हा इम्पॅक्ट असेल तर बाकीच्या गोष्टी उघड उघड दिसत आहेत. लाडकी बहीणपेक्षा आमच्या सभेला प्रचंड गर्दी होत होती, घर कसं चालवायचं, कारण महागाई वाढतेय, असं विचारलं जातं होतं. मग वाढती महागाईची शाबासकी म्हणून मत दिलंय का? असा प्रश्न विचारताच ते पुढे म्हणाले, “हा टोमणा नाही, पण अस्सल भाजपाचा मुख्यमंत्री होईल का? असाही प्रश्न त्यांनी भाजपाला विचारला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article