Ad imageAd image

महायुतीला १२२ पेक्षा जास्त जागा, तर मविआला किती? एक्झिट पोलचे अंदाज समोर!

ratnakar
महायुतीला १२२ पेक्षा जास्त जागा, तर मविआला किती? एक्झिट पोलचे अंदाज समोर!
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2024 Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll Updates : लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकीची प्रतिक्षा अवघ्या राज्याला होती, ती अखेर संपली आहे. मतदानाची वेळ आता संपली असून राज्यात पुन्हा कोण सत्ता स्थापन करणार याचे अंदाज आता येऊ लागले आहे. विविध माध्यम आणि संस्थांकडून एक्झिट पोल जाहीर केले जात असून पोल डायरीने दिलेल्या अंदाजानुसार यंदाच्या निवडणुकीत शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजपाच्या महायुतीला मतदारांना कौल दिल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पोल डायरीच्या अंदाजानुसार, महायुतीत भाजपाला ७७ ते १०८, शिवेसना (एकनाथ शिंदे) पक्षाला २७ ते ५०, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला १८ ते २८ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच, महायुतीला १२२ ते १८६ जागा मिळू शकतात, असा अंदाज आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसला २८ ते ४७, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला २५ ते ३९ जागा आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाला १६ ते ३५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. म्हणजेच महाविकास आघाडीला ६९ ते १२१ जागा मिळू शकतात. तर, जवळपास १२ ते २९ अपक्ष निवडून येण्याची शक्यताही या पोल डायरीतून वर्तवण्यात आली आहे.
चाणक्य
महायुती – १५२ ते १६०महाविकास – १३० ते १३८इतर – ६ ते ८
पिपल्स पल्स
महायुतीला – १७५ ते १९५महाविकास आघाडी- ८५ ते ११२इतर- ६ ते १२
पी मार्क
महायुती – १३७ ते १५७महाविकास आघाडी – १२६ ते १४६इतर – २ ते ८
PMARQ पोल
महायुती – १३७ ते १५७महाविकास आघाडी – १२६ ते १४६इतर – २ ते ८
CNBC Matriz
महायुती – १५०ते १७०महाविकास आघाडी – ११० ते १३०इतर – ८ ते १०
प्रमुख पक्षांचे उमेदवार
भाजप १४९
काँग्रेस १०१
शिवसेना( उद्धव ठाकरे) ९५
शिवसेना (शिंदे) ८१
राष्ट्रवादी (शरद पवार) ८६
राष्ट्रवादी (अजित पवार) ५९
मनसे १२५
वंचित २००
अपक्ष २०८६
२०१९ विधानसभा निवडणूक
भाजपा – लढवलेल्या जागा -१६४, विजय – १०५शिवसेना – लढवलेल्या जागा – १२८, विजय – ५६राष्ट्रवादी काँग्रेस – लढवलेल्या जागा – १२१, विजय – ५४काँग्रेस – लढवलेल्या जागा – १४७, विजय – ४४

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article