Ad imageAd image

धम्मचक्र प्रवर्तन दिन : दीक्षाभूमीवर लांबच लांब रांगा, पण कमालीची  शिरतबद्धता !

ratnakar
धम्मचक्र प्रवर्तन दिन : दीक्षाभूमीवर लांबच लांब रांगा, पण कमालीची  शिरतबद्धता !
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नागपूर : धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळ्यासाठी देश-विदेशातून लाखो अनुयायांचे आगमन शहरात झाले आहे. दीक्षाभूमीकडे जाणारे रस्ते भीम अनुयायांनी गजबजले आहेत. दीक्षाभूमी स्तुपात जाण्यासाठी लांबच लांब रांगा बघायला मिळत आहे. इतकी मोठी गर्दी असताना देखील दीक्षाभूमीमध्ये अनुयायांमध्ये कमालीची शिस्तबद्धता दिसत आहे. या अनुयायांच्या सेवेसाठी तरुणाईही मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याचे चित्र दीक्षाभूमीत बघायला मिळत आहे.

धम्मदीक्षा सोहळ्यासाठी दरवर्षी लाखोच्या संख्येत अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. यामधील बहुतांश अनुयायी ग्रामीण भागातून येतात. त्यामुळे त्यांच्यात जनजागृती करण्यासाठी मोठ्या संख्येत स्टॉल लावले जातात. तरुणाई मोठ्या प्रमाणात या स्टॉल मार्फत लोकांमध्ये जनजागृती करताना दिसत आहे. अनेक संघटनांच्या मार्फत पथनाट्याच्या माध्यमातून माहिती दिली जात आहे. विविध वैद्यकीय कॅम्पमध्येही तरुण दिसत आहेत. डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थीनी राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) च्या माध्यमातून अनुयायांच्या सेवेत लागले आहे. समता सैनिक दलामध्ये देखील लहान मुले आणि तरुण काठी घेऊन दीक्षाभूमीवर शिस्त आणि शांतता भंग होणार नाही याची काळजी घेताना दिसत आहेत.

शासकीय रुग्णालय, मेयो रुग्णालय, दंत महाविद्यालय, लता मंगेशकर रुग्णालयामधील तरुण डॉक्टर्स अनुयायांच्या सेवेत रुजु आहेत. शहरातील सिकलसेल सोसायटी ऑफ इंडिया आणि मेयो रुग्णालयाच्या मार्फत सिकलसेलबाबत जनजागृती केली जात आहे. किशोर राऊत या तरुणाने सांगितले की आंबेडकरी समाजातील तरुणांमध्ये सिकलसेलबाबत जनजागृती करण्यासाठी आम्ही कार्य करत आहोत. तरुणांच्या मार्फत तरुणांना माहिती दिल्यास ते अधिक लक्ष देऊन ऐकतात, त्यामुळे आमच्या समूहात मोठ्या प्रमाणात तरुण दिसत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article