Ad imageAd image

शेतकर्‍यांच्या विश्वासावर कारखान्याची वाटचाल : आर. आय. पाटील

ratnakar
शेतकर्‍यांच्या विश्वासावर कारखान्याची वाटचाल : आर. आय. पाटील
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे उपाध्यक्ष आर. आय. पाटील हे होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, समाजातील अनेक मोठ्या लोकांच्या मार्गदर्शनानुसार, सहकारी संस्थांच्या मदतीने आणि ऊस उत्पादकांच्या सहकार्याने कारखाना सुरू झाला आहे. पण आजही कारखान्यासमोर आर्थिक संकट आहे. या संकटावर सर्वांनी मिळून मात करावी लागणार आहे.
शेतकर्‍यांच्या विश्वासावर कारखान्याची वाटचाल सुरू आहे. अजूनही संकटे कमी झालेली नाहीत. त्यामुळे ऊस उत्पादक आणि ठेवीदारांनी कारखान्याला मदत करावी. येणारे भविष्य आपल्या हाती आहे. हा हक्काचा कारखाना शेतकर्‍यांच्या पाठीशी थांबणार आहे. त्यामुळे येणार्‍या संकटाला एकजुटीने सामोरे जाण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
आर. आय. पाटील पुढे म्हणाले, आम्ही यावर्षी 3 लाख टन ऊस गाळपाचे लक्ष्य ठेवले आहे. हे उद्दिष्ट्य पार पडले तर आम्ही महत्वाची कामगिरी बजावू शकतो. त्यामुळे सर्वांनी आम्ही सर्वांनी एकजुटीने कारखान्याच्या विकासासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कारखान्याचे व्यवस्थापकिय संचालक जेबिउल्ला के. म्हणाले,कारखान्याची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे. सर्वांनी कारखान्याला ऊस पाठवून मदत करावी, असे आवाहन केले.
यावेळी गत गाळप वर्षात कारखान्याला सर्वाधिक ऊस पुरवठा केलेल्या उत्पादकांचा, सर्वाधिक वाहतूक करणार्‍यांचा सत्कार शिवाजी सुंठकर, निंगाप्पा जाधव, मनोहर हुक्केरीकर, अनिल कुट्रे, एस. एल. चौगुले, पुंडलिक पावशे, भरत शानभाग आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालक सुनील अष्टेकर यांनी स्वागत केले. शिवाजी कुट्रे यांनी आभार मानले.
यावेळी व्यासपीठावर माजी अध्यक्ष अविनाश पोतदार, जोतिबा आंबोळकर, चेतक कांबळे, बसवंत मायान्नाचे, बाबासाहेब भेकणे, सिद्दाप्पा टुमरी, बाबुराव पिंगट, बसवराज गानिगेर, लक्ष्मण नाईक, युवराज पावले, वनिता अगसगेकर आणि वसुधा म्हाळोजी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article