बेळगाव : केंद्रीय रेल्वे आणि जल शक्ती राज्यमंत्री व्ही. सोमन्ना हे येत्या सोमवार दि. 16 सप्टेंबर 2024 रोजी कोल्हापूर आणि बेळगाव दौऱ्यावर येत असून त्यादिवशी वंदे भारत एक्सप्रेसच्या बेळगाव येथील स्वागत समारंभाला हजेरी लावणार आहेत.
केंद्रीय रेल्वे आणि जल शक्ती राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांचा कोल्हापूर व बेळगाव दौऱ्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे असणार आहे. सोमवारी 16 सप्टेंबर रोजी सकाळी 6:15 वाजता विमानाने (6ई 2511) दिल्ली येथून प्रस्थान आणि 8:35 वाजता बेळगाव येथे आगमन होईल नंतर बेळगाव येथे अल्पकाळ थांबून सकाळी 10 वाजता बेळगाव येथून रस्ते मार्गाने महाराष्ट्रातील कोल्हापूरकडे प्रयाण करतील.
कोल्हापूर येथे दुपारी 12:30 वाजता आगमन झाल्यानंतर दुपारी 1 वाजता श्री करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मी मंदिरात देवीचे दर्शन घेऊन नागाळा पार्क कोल्हापूर येथील भाजप पक्ष कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन दुपारी 2:30 वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरच्या नूतनीकरण कामाची पाहणी केल्यानंतर सायंकाळी 4 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते केल्या जाणाऱ्या कोल्हापूर -पुणे वंदे भारत एक्सप्रेस शुभारंभाच्या कार्यक्रमाला श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग लिंकद्वारे उपस्थित राहणार आहेत. कोल्हापूर येथून सायंकाळी 4:45 वाजता प्रस्थान आणि सायंकाळी 7:30 वाजता बेळगावमध्ये आगमन आहे.
बेळगाव रेल्वे स्थानक येथे रात्री 8 वाजता केंद्रीय मंत्री सोमन्ना पुणे -हुबळी वंदे भारत उद्घाटनाच्या विशेष रेल्वेचे स्वागत करतील. बेळगाव येथून रात्री 9:15 वाजता बेळगाव येथून हुबळीच्या दिशेने प्रस्थान आणि हुबळी येथे रात्री 10:30 वाजता आगमन होऊन हुबळी येथे रात्री मुक्काम करून मंगळवार दि. 17 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 8:55 वाजता हुबळी येथून विमानाने (6ई 2115) नवी दिल्लीला प्रयाण करतील आणि दिल्ली येथे सकाळी 11:25 वाजता आगमन करतील.