ऐकून नवल वाटेल! ‘या’ देशाने अदानींचे थकवले तब्बल ५०० दशलक्ष डॉलर
जगातील तसेच देशातील काही अब्जाधीश उद्योगपती विविध कारणांमुळे चर्चेत असतात. भारतातील अब्जाधीश उद्योगपती गौतमी अदानी सोमवारी चर्चेत आलेत, याचे कारण म्हणजे बांग्लादेशाने अदानी उद्योग समूहाचे ५०० दशलक्ष डॉलर थकवले आहेत. ही रक्कम तातडीने भागवावी, अशी नोटीस अदानी उद्योग समूहाने बांग्लादेशच्या अंतरीम सरकारला पाठवली आहे.
Adani Bangladesh Payment Delays:
ईकॉनॉमिक टाईम्स ने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे की, “एका ऊर्जा प्रकल्पासंदर्भातील ही थकबाकी आहे. ही थकलेली रक्कम बांग्ला देशातील अंतरिम सरकारसाठी डोकेदुखी बनली आहे. गेल्या महिन्यात शेख हसीना यांना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे लागले. तत्कालीन हसीना सरकार आणि अदानी उद्योग समूह यांच्यातील करार टीकेचे लक्ष बनले होते. भारतातील गोडा येथील अदानींच्या ऊर्जा प्रकल्पातून बांगला देशाला वीज पुरवली जाते. ही वीज महाग दराने घेतल्याची टीका हसिना यांच्यावर झाली होती.
बांगला देशचा वीज पुरवठा खंडित करणार नाही : अदानी
अदानी उद्योग समूहाने बांगला देशाकडे थकित असलेल्या रकमेबद्दल खुलासा केला आहे. “आर्थिक तणाव वाढत असला तरी बांगला देशाला चांगली वीज पुरवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. यासंदर्भात आम्ही बंगलादेश सरकारशी चर्चाही करत आहोत. बांगला देशाला वीज पुरवठा करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, आम्ही आम्हाला वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांबद्दलही कटीबद्ध आहोत.”
आंतराष्ट्रीय संस्थांची मदत घेणार : बांगला देशची स्पष्टाेक्ती
Financial Timesने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की, “बांगला देशावर ऊर्जेसंदर्भातील प्रकल्पांचे कर्ज ३.७ अब्ज डॉलर इतके आहे. बांगला देशाचे ऊर्जा सल्लागार मुहम्मद फौजुल कबिर खान यांनी म्हटलं आहे की, अदानी उद्योग समूहाचे एकूण ८०० दशलक्ष डॉलरचे देणे आहे, त्यातीलच ही रक्कम आहे, ही रक्कम देण्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय संस्थांकडून सहकार्य घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत.”