Ad imageAd image

शेतकऱ्यांचा बुधवारी हेस्कॉम कार्यालयावर धडक मोर्चा

ratnakar
शेतकऱ्यांचा बुधवारी हेस्कॉम कार्यालयावर धडक मोर्चा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : मागील कर्नाटक सरकारने अंमलात आणलेले तीन कृषी कायदे रद्द व्हावेत यासाठी शेतकऱ्यांनी काँग्रेस सरकार सत्तेवर आणले. या सरकारनेही सत्तेवर येतात ते कायदे तात्काळ रद्द करण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र ते अजूनही मागे न घेतल्याने आणि शेतकऱ्यांच्या समस्येत वाढच होत आहे. तेंव्हा विजेच्या समस्येसह अन्य समस्यांना वाचा फोडून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कर्नाटक राज्य रयत संघटना-हरितसेना माध्यमातून बेळगाव जिल्हा रयत संघटनेतर्फे येत्या बुधवार दि. 4 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता नेहरूनगर येथील हेस्कॉमच्या मुख्य कार्यालयावर समस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

राज्य रयत संघटना-हरितसेनेचे राज्याध्यक्ष कोडिहळ्ळी चंद्रशेखर यांच्या आदेशानुसार हे आंदोलन होणार आहे. तेंव्हा बेळगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बेळगाव शहर, तालूका रयत संघटना -हरितसेनेतर्फे करण्यात आले आहे. येताना प्रत्येकाने हिरवा टॉवेल घेऊन आल्यास खरा शेतकरी ही ओळख सिध्द होईल. भाषा,जात,पंथ,पक्ष विसरुन सर्वांनी आंदोलनात सहभागी व्हावे असेही नमूद करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या कांही प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे :
1) आधीची आक्रम सक्रम योजना होती त्यात शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बोअर मारल्यास काही ठराविक रक्कम घेऊन त्याच्या शेतापर्यंत विद्यूत खांब व तारा घालून बोअर मोटरला विद्यूत पुरवठा दिला जात होता. ती योजना बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या बोअरपर्यंत विजेची सोय करण्यासाठी जवळपास 2.5 लाखपर्यंत खर्च येतो. हा खर्च शेतकऱ्यांना न परवडणारा असल्याने पुन्हा तात्काळ अक्रमसक्रम योजना सुरु करावी.
2)अलिकडे विद्यूत खाते जे आधारकार्डला आपल्या आयपीसेटचा आरआर नंबर लिंक करत आहेत. त्यामुळे मोबाईल प्रमाणे बोअरच्या मोटारीचा वीज पुरवठा पैसे भरुन रिचार्ज करावा लागत आहे. त्यामुळे रिचार्ज वेळेवर केले तर ठीक अन्यथा बोअर बंद अशी परिस्थिती निर्माण होत आहे. तेव्हा आधी प्रमाणे मोफत विजपुरवठा तसाच सुरु करावा.
3) विद्यूत स्पर्शाने जर शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास ताबडतोब 10 लाख रु नुकसान भरपाई द्यावी.
4)शेतकऱ्यांना सोलार पंपाची बळजबरी न करता त्यांना विद्यूत पुरवठाच द्यावा.
5)घरगुती वापरासाठी 200 युनिट मोफत म्हणून आश्वासनं दिली ती आता बंद होऊन पुन्हा भरमसाठ बील येत आहे.
हा प्रकार बंद करुन दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना 200 युनिट वीज मोफत द्यावी. 6)शहरी भागाप्रमाणे शेतात घर असणाऱ्या शेतकऱ्यांना सिंगलफेस निरंतर वीज द्यावी. आपल्या मागण्या पूर्ण झाल्याखेरीज आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा सज्जड इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article